agriculture news in Marathi farmer beaten by trader in Nashik Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नाशिक बाजार समितीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

असतानाच सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी रामदास आहिरे यांना बाजार समिती आवारात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार ताजा असतानाच सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी रामदास आहिरे यांना बाजार समिती आवारात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यावर कारवाई करूनही मुजोरी कमी न होता, थेट मारहाण केल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे अन् संतापाचे वातावरण आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे, की सटाणा तालुक्यातील कुपखेड येथील भाजीपाला उत्पादक रामदास आहिरे कोथिंबीर विक्रीसाठी गुरुवारी (ता. १९) बाजारात आले होते. बाजार समितीतील ‘शिवांजली’ नाव असलेल्या आडतीमध्ये कोथिंबीर विक्रीसाठी लावली. या वेळी आणलेल्या मालाचे दोन वक्कल केले. एक वक्कल संजय जाधव, तर दुसरे वक्कल पवन पाटील यांनी खरेदी केले. खरेदी झाल्यानंतर पवन पाटील यांनी माल भरून घेतला, मात्र जाधव यांनी शेतीमाल भरून घेतला नाही. रात्री उशीर होत असल्याने आम्हाला दूर जायचे आहे, शेतीमाल लवकर भरून घ्या, अशी विनंती श्री. आहिरे यांनी व्यापाऱ्याकडे केली. 

यावर माल भरून न घेता संजय जाधव यांच्या मुलांनी अर्वाच्च भाषेत अश्‍लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला. या वेळी शेतकरी आहिरे यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी मारहाणीत गहाळ झाली. त्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतल्यानंतर त्यास त्याची भरपाई देऊन प्रकरण दाबल्याचे सांगितले जात आहे.मात्र असे प्रकार घडत असल्याने बाजार समितीतील सुरक्षा व्यवस्था असल्याचे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

मुजोरी कधी थांबणार?
संबंधित व्यापाऱ्याने बाजार समितीकडे तक्रार केली नाही. तरीही संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली असल्याचे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी सांगितले. व्यापाऱ्याचा परवाना रद्द करून लिलावात सहभागी होऊ नये, याबाबत कळविले आहे. मात्र व्यापाऱ्यांची मुजोरी कधी थांबणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. अलीकडेच घडलेल्या दोन्ही प्रकरणांत शेतकरी हे माजी सैनिक आहेत. 

प्रतिक्रिया
शेतकरी काबाडकष्ट करतो. दोन पैसे मिळतील या आशेने नाशिक बाजार समितीत शेतीमाल विक्री करण्यासाठी येतो. मात्र येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांवर दादागिरी करतात. वेळप्रसंगी मारहाणही करतात. त्यामुळे ही बाजार समिती आहे, की गुंडांचा अड्डा? हे बाजार समितीने सांगावे. अन्यथा, शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी व्यवस्था करावी.
- रामदास आहिरे, पीडित शेतकरी, कुपखेड, ता. सटाणा


इतर अॅग्रो विशेष
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...