agriculture news in Marathi farmer is center point of government Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

जळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा उपाय नाही. कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा तयार करत आहे.  शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. १५) येथे दिले.
 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

जळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा उपाय नाही. कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा तयार करत आहे.  शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. १५) येथे दिले.
 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी हा आपल्या राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहील. प्रत्येक शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, म्हणून शासन कृतिशील कार्यक्रम तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज, तसेच मुबलक पाणी हवे आहे, याची मला कल्पना आहे, त्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. भारताला संपन्न राष्ट्र बनवायचे असेल तर शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान द्यावा लागणार आहे.’’

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, दलीचंद जैन, कविवर्य ना. धों. महानोर आदी उपस्थित होते. हा पुरस्कार नंदापूर (जि. जालना) येथील शेतकरी दत्तात्रेय भानुदासराव चव्हाण यांना या वेळी प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह , शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. 

जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आभार मानले. 

केंद्राच्या सहकार्याची गरज ः शरद पवार
शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवण्यासाठी केंद्राने राज्याला सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...