जालना जिल्ह्यात शेतकरी कंपन्यांना विद्युत जोडणीची प्रतीक्षा

जालना : प्रक्रिया उद्योग, धान्य स्वच्छता प्रतवारी केंद्र, गोदाम उभारणी, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आदी प्रकल्प उभे करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजूनही विद्युत जोडणी व कृषी दराने विद्युत पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.
 Farmer companies waiting for electricity connection in Jalna district
Farmer companies waiting for electricity connection in Jalna district

जालना : प्रक्रिया उद्योग, धान्य स्वच्छता प्रतवारी केंद्र, गोदाम उभारणी, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आदी प्रकल्प उभे करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजूनही विद्युत जोडणी व कृषी दराने विद्युत पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात ६ ऑगस्ट रोजी पत्र देऊन तत्काळ पावले उचलण्याचे निर्देशित केले होते, हे विशेष.

शासनाकडून कृषी विभाग गट शेती प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा उद्देश शेतकरी गट कंपनीच्या उत्पादनामध्ये वाढ, निव्वळ नफा व पर्यायी बाजार व्यवस्था करणे हा आहे. यासाठी २०१७-१८ मध्ये ७ शेतकरी उत्पादक गट कंपनी व २०१८-१९ मध्ये एका शेतकरी उत्पादक गटास मंजुरी देण्यात आली आहे. 

मंजुरी देण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांनी शासनाच्या अनुदानाच्या माध्यमातून धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र, दूध प्रक्रिया युनिट उभारणी, फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिट आदी उभे केले आहेत. परंतु, विजेअभावी हे सर्व युनिट शोभेच्या वास्तू बनवून राहिले आहेत.

जालना जिल्हा स्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या मागणी अर्जाचा विचार करून गट शेती प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे योजनेअंतर्गत कृषी दराने विद्युत जोडणीबाबत निर्णय झाला.  त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जालना येथील कार्यकारी अभियंत्यांना ६ ऑगस्टला पत्र लिहून जिल्ह्यातील ७ शेतकरी उत्पादक गट कंपन्यांकडून कृषी दराने विद्युत जोडणी किंवा रोहित्र व विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी आल्यास त्याला प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. 

कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड जालनाच्या कार्यकारी अभियंत्यांना केली होती. परंतु, आजपर्यंत त्याविषयी कुठलीच हालचाल झाली नसल्याची माहिती शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सूत्रांनी दिली. एवढेच काय, तर फेब्रुवारी २०१९ मध्ये मंजुरी देऊनही विद्युत जोडणी वा पुरवठा केला गेला नाही, अशी माहिती शेतकरी उपासक कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी देत अशा परिस्थितीत कसे प्रक्रिया वा इतर प्रकल्प सुरू होतील, असा प्रश्न केला आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये विद्युत वितरण कंपनीने आम्हाला विद्युत जोडणी व कृषी दराने विद्युत पुरवठा मंजूर केला. परंतु, अजूनही विद्युत जोडणीच मिळाली नाही. - विजय म्हस्के, पूर्णा केळना शेतकरी उत्पादक कंपनी, बरंजळा लोखंडे (ता. भोकरदन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com