शेतकरी दांपत्यात पाहिले विठ्ठल-रुक्मिणीला ः कृषिमंत्री भुसे

नाशिक : कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने कृषिमंत्री दादा भुसे हे जात असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धोंडेगाव येथील शेतकरी कुटुंबाच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी या वृद्ध शेतकरी दांपत्याच्या रूपात विठ्ठल-रुक्मिणीला पाहिल्याची भावना कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली.
The farmer couple in saw Vitthal-Rukmini: Agriculture Minister Bhuse
The farmer couple in saw Vitthal-Rukmini: Agriculture Minister Bhuse

नाशिक : कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने कृषिमंत्री दादा भुसे हे जात असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धोंडेगाव येथील शेतकरी कुटुंबाच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी या वृद्ध शेतकरी दांपत्याच्या रूपात विठ्ठल-रुक्मिणीला पाहिल्याची भावना कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली. या भेटीमुळे व सन्मानाने कुटुंबाला आनंद गगनात मावेनासा झाला होता.

नियोजित कार्यक्रमासाठी कृषिमंत्री जात असताना त्यांनी अचानक ताफा थांबविला अन् काळू बेंडकोळी आणि त्यांची पत्नी चंद्रभागा यांची भेट घेतली. अचानक आलेले नेते पाहून शेतकरी काही क्षण गोंधळात पडला. मात्र, कृषिमंत्र्यांनी दर्शन घेत त्यांच्या प्रति आदरभाव प्रकट केल्यानंतर तेही सुखावले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह विविध पदाधिकारी भेटल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

कृषिमंत्री भुसे म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्याची भेट घ्यावी. त्यांची विचारपूस करावी, या हेतूने मी हा कार्यक्रम ठरविला होता. आषाढी एकादशी असल्याने मला साक्षात विठ्ठल-रुक्मिणी भेटल्याचा आनंद झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com