agriculture news in Marathi farmer create banana plants of indigenous verity Maharashtra | Agrowon

केळीच्या देशी वाण संवर्धनासाठी शेतकऱ्याने घरीच तयार केली रोपे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

 मागील अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करणारे जिल्ह्यातील दिग्रस बुद्रूक (ता.पातुर) येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांनी केळीची घरीच रोपनिर्मिती सुरु केली आहे. 

अकोला ः मागील अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करणारे जिल्ह्यातील दिग्रस बुद्रूक (ता.पातुर) येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांनी केळीची घरीच रोपनिर्मिती सुरु केली आहे. देशी वाणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांनी या माध्यमातून केळीचे बेणे वृद्धींगत करण्याचे काम सुरु केले आहे. 

याबाबत माहिती देताना ताले म्हणाले की, साधारणपणे सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना रस्त्यांवर केळीचे कंद पडलेले दिसले होते. ते उचलून आणत त्यांनी शेतात लागवड केली. स्वतः शेतामध्ये पाच झाडे लावली. त्यापासून १०-१५ झाडे तयार केली. पुढे हीच संख्या शंभरावर पोचविली. घरी तसेच मित्रांना या झाडांवर लागलेली केळी खायला द्यायचे. त्याची चव उत्कृष्ट होती. त्यानंतर ताले यांनी २०० झाडांची लागवड केली आणि यातून तयार झालेली केळीची विक्री सुरु केली. या काळात अनेक शेतकऱ्यांनी भेटी देत केळीची मागणी केली. 

चार वर्षांपूर्वी (सन २०१६) आपण २०० झाडांचे २ प्लांट तयार केले. यात सरासरी २५ ते ३० किलो वजनाचे घड मिळू लागले. जवळपास एक लाखांचे उत्पादन आले. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या या झाडांची उत्कृष्ट चव आणि लांब व जाड आकार यामुळे मागणी वाढली. या केळीची लागवड वाढविण्याचा निश्चय करीत त्यांनी या झाडांपासून रोपे तयार करण्यासाठी बेणे कंपन्यांसोबत संपर्क केले.

परंतु कंपन्यांनी बेणे तयार करण्याचे नाकारत स्वतः कडील टिश्यू कल्चरची रोपे घ्या असा सल्ला दिला. ही बाब आपणास खटकली. त्यामुळे स्वतःच केळीची रोपे आता आपण तयार करू असा निश्चय केला. यासाठी एका कृषी कंपनीतील त्यांचे मित्र सतीश म्हसकर यांनी मला घरच्या घरीच वंशवृद्धी (Propagation) पद्धतीने रोपे तयार करण्याबाबत तांत्रिक माहिती दिली. याद्वारे दोन हजार रोपे तयार करुन एक एकर केळीची बाग उभी केली आहे. 

टिश्यू कल्चरचा व त्या माध्यमांतून आणलेल्या रोपांसाठी केला जाणारा शिल्लकचा रासायनिक खर्च थांबवता येईल व कमी खर्चात लागवड करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रतिक्रिया
सर्वसाधारणपणे एका डोळ्यापासून एक रोप तयार होते. पण आपण कल्पकतेने टिश्यू कल्चर तंत्रा प्रमाणेच स्वत: चे तंत्रज्ञान वापरुन एका डोळ्यांपासून २० ते २५ रोपे तयार केली. यात यश आल्याने आता उत्साह वाढला आहे. अशा प्रकारे पुढील वर्षी जास्त संख्येने रोपे तयार करणार आहे 
- राजेंद्र ताले, शेतकरी. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...