शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल संघात निवड

शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल संघात निवड
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल संघात निवड

नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी कुटुंबातील अशोक व अनिता पगार यांची कन्या मंजूषा हिची भारतीय बेसबॉल संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवड होणारी ती मालेगावची पहिली खेळाडू ठरली आहे. चीनमधील झोनगशन येथे होणाऱ्या दुसऱ्या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मंजूषाची निवड झाली. 

मंजूषा ही शेतकरी कुटुंबातील असून तिने मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील जिद्दी खेळाडू म्हणून मंजूषा परिचित आहे. तिच्या खेळासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनसह अनेक सेवाभावी संस्था यांनी सदैव तिला मदत केली आहे. 

मंजूषा ही गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक डॉ. सुरेखा दप्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून मागील चार वर्षांपासून ती महाराष्ट्र बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीची भारतीय बेसबॉल संघटनेने दखल घेत तिची भारतीय संघात निवड केली. तिच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com