कडकनाथ फसवणूकप्रकरणी महारयतवर कारवाईची मागणी

कडकनाथ फसवणूकप्रकरणी महारयतवर कारवाईची मागणी
कडकनाथ फसवणूकप्रकरणी महारयतवर कारवाईची मागणी

कोल्हापूर ः कडकनाथ कोंबडी देण्याच्या आमिषाने हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत ॲग्रो कंपनीवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. जानेवारी २०१८ पासून या भागातील शेतकऱ्यांनी या कंपनीशी करार केले. करार करताना ७५ हजार रुपये, त्यानंतर एक लाख रुपये भरून घेऊन कंपनीने करार केले. या करारानुसार कंपनीकडून एक दिवसाचा व तीन महिन्यांचा कडकनाथ पक्षी, पशुखाद्य, भांडी, वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी संगोपन केलेल्या पक्ष्याची अंडी व पक्षी परतावा म्हणून द्यायचे होते, त्या बदल्यात कंपनीकडून रोख स्वरूपात पैसे दिले जाणार होते. पण त्यानंतर कंपनीने करारात बदल करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. कंपनीकडून खाद्य त्वरित मिळावे, अंड्यांची उचल वेळोवेळी करावी, उचल केलेल्या अंड्यांना कराराप्रमाणे दर मिळावा, उचल केलेल्या पक्ष्यांची रक्कम द्यावी, नव्याने बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पक्षी द्यावेत, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास सदर कंपनीवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com