Agriculture news in Marathi, farmer destroys grapes plants due to heavy losses | Agrowon

अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून द्राक्ष बागेचा हा डोलारा उभा केला होता. काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत दोन पैसे ही कमावले. मात्र नैसर्गिक संकटांचा सामना करत बचत केलेले थोडेफार पैसे सर्व खर्च झाले. बागांच्या नियोजनात रात्रंदिवस कष्टाची जोड दिली. एवढं करून दर्जेदार उत्पादन डोळ्यासमोर असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. सारखा पाऊस होत असल्यानं आलेल्या द्राक्ष मालाची सड झाली. आता मात्र हाती काहीच उरले नाही.

नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून द्राक्ष बागेचा हा डोलारा उभा केला होता. काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत दोन पैसे ही कमावले. मात्र नैसर्गिक संकटांचा सामना करत बचत केलेले थोडेफार पैसे सर्व खर्च झाले. बागांच्या नियोजनात रात्रंदिवस कष्टाची जोड दिली. एवढं करून दर्जेदार उत्पादन डोळ्यासमोर असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. सारखा पाऊस होत असल्यानं आलेल्या द्राक्ष मालाची सड झाली. आता मात्र हाती काहीच उरले नाही. या नैराश्यातून सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी त्र्यंबक दादाजी भामरे व त्यांचा मुलगा प्रशांत याने जड अंतःकरणाने स्वतः द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवीत बाग तोडून टाकली आहे.

त्र्यंबक दादाजी भामरे यांना २ एकर शेती. त्यात पीक म्हणून द्राक्षांची निवड केली. दोन एकर क्षेत्रावर थॉमसन वाणांची २ एकर बाग होती. या वर्षी हंगाम घेताना खर्च झाला. त्यात मागील वर्षी गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. सिंचनासाठी पाणी नसल्याने प्रति टँकर ७०० रुपयांप्रमाणे पाणी विकत घेऊन बागा जगविल्या. 

या मोठ्या परीक्षेनंतर पुन्हा हंगाम उभा करण्यासाठी आतापर्यंत एकरी ३ लाख म्हणजे २ एकरासाठी ६ लाख रुपये खर्च केला. मात्र दिवाळीत भाऊबिजेच्या दिवशी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) मुसळधार पाऊस झाला. सलग दोन दिवस चाललेल्या या पावसाने सर्व स्वप्न धुळीस मिळाले. संपूर्ण खर्च आता मातीमोल झाला आहे. हातचं सर्व भांडवल खर्च तर झालंच मात्र आता काहीच हाती न उरल्याने त्र्यंबक भामरे यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेतला. 

‘‘इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च अधिक असल्याने बँकेचे कर्ज, सोने नाणे मोडून अन् प्रसंगी उसनवारी करून बाग उभी केली. यावरच कुटुंबाचा रोजगार व अर्थकारण अवलंबून आहे. 

मात्र मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक समस्यांशी लढत बागा जगविल्या. थोडेफार पैसे मिळाल्याने बाग जगवीत कुटुंब चालविले. मात्र या बागांना माॅन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. आता हिंमत राहिली नाही, पुन्हा पुढील हंगाम करण्यासाठी भांडवल कुठून आणायचा हा प्रश्‍न त्यांच्या समोर होता, या मन स्थितीतच हा निर्णय घेतला. 

मागील वर्षी ७ लाख उत्पन्न मिळाले होते. खर्च जाऊन थोडेफार पैसे उरले होते, त्यातून घरखर्च, उधाऱ्या दिल्या. मात्र आता हाती काहीच उरलेलं नाही. आमच्या भागात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे’’, असे भामरे सांगतात.

आमच्यावर भयानक परिस्थिती आहे, हे नुकसान आता सोसवत नाही. येणाऱ्या काळात पुन्हा कसे उभे राहायचे हा मोठा प्रश्‍न आहे. आता खर्च झाला पुढच्या वर्षी एवढा खर्च कसा करणार? सरकारने आता नुकसानभरपाई द्यावी, नाहीतर कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, तरच आम्ही उभे राहू शकू, नाहीतर पुढे विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. 
- प्रशांत भामरे, युवा शेतकरी, पिंगळवाडे, ता. सटाणा


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...