नोकरीचे आमिष दाखवीत शेतकऱ्याची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवीत शेतकऱ्याची फसवणूक
नोकरीचे आमिष दाखवीत शेतकऱ्याची फसवणूक

नागपूर ः सुशिक्षित मुलांनी शेतीऐवजी नोकरी करावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्बल १२.६० लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी या घटनेचा प्रमुख सूत्रधार आशिष महाजन यांच्यासह टोळीतील तब्बल पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.  गोंदिया जिल्ह्यातील भादा येथील नुतनलाल नागपूरे यांना अनिल आणि सुनील ही दोन मुले. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या या मुलांनी शेतीत राबण्याऐवजी नोकरी करावी, अशी नुतनलाल नागपूरे यांची इच्छा होती. या कुटुंबीयांकडे जेमतेम तीन एकर शेती. याच शेतीतील उत्पन्नावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान नोकरीच्या शोधार्थ असलेल्या नुतनलाल यांची गावातीलच सिन्नु नावाच्या युवकाशी भेट झाली. सिन्नुने त्यांना नागपुरातील काहींच्या मदतीने त्यांच्या दोन्ही मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याकरिता नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकानजीक असलेल्या चौघांसोबत भेट करून          दिली.  आशिष महाजन याने महालेखाकार कार्यालयात नोकरी लावून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याकरिता १२ लाख ६० हजार  रुपयांची मागणी करण्यात आली. टोकन म्हणून एक लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर टप्याटप्याने १२.६० लाख रुपये देण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर नागपूरेंच्या मुलांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले. महालेखाकार कार्यालयात हे नियुक्‍तीपत्र घेऊन गेल्यानंतर ते बनावट असल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागपूरे यांनी गणेशपेठ पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी आशिष महाजन व त्यांच्या टोळीतील सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com