Agriculture news in Marathi farmer dont get harvester for wheat mealting | Agrowon

वाशीम : गहू काढणीसाठी शेतकऱ्यांना हार्वेस्टर मिळेना 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

रिसोड जि. वाशीम ः तालुक्यात यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र वाढविले होते. गव्हाचा विक्रमी पेरा झालेला आहे. मात्र, ऐन काढणीच्या हंगामात लहरी पावसाचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे हवामान बदल झाला असल्याने शेतकऱ्यांनी गहू मळणीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. 

रिसोड जि. वाशीम ः तालुक्यात यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र वाढविले होते. गव्हाचा विक्रमी पेरा झालेला आहे. मात्र, ऐन काढणीच्या हंगामात लहरी पावसाचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे हवामान बदल झाला असल्याने शेतकऱ्यांनी गहू मळणीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. 

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यातून हार्वेस्टर मशीन दाखल झाले आहेत. गहू कापणीसाठी मजुरांकडून मजुरीचे वाढीव दर मागितले जात आहेत. शिवाय दर देऊनही काम वेगाने होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टरद्वारे मळणी करण्यास प्राधान्य दिले आहे. एकाच वेळी गहू काढणीसाठी शेतकरी सरसावले असल्याने हार्वेस्टर चालकांकडे वेटींग लिस्ट तयार झाली आहे. 

शेतकऱ्यांना गहू सोंगणी, मळणीसाठी मोठा खर्च येतो. परंतु हार्वेस्टरने मळणी केल्यास एकरी १७०० ते १८०० रुपयांत काम होते. कमी वेळेत हमखास पीक हातात पडते. त्याही कारणाने यंत्राला पसंती वाढली आहे.

गहू सोंगणीस एक मजूर दोनशे रुपये दररोज प्रमाणे सांगावा लागतो. यामुळे एकरी दोन हजार खर्च होतो. तसेच मळणीसाठी वेगळा खर्च येतो. त्यामुळे हार्वेस्टरने मळणी केल्याने १५०० रुपयांत व कमी वेळेत काम होते. 
- नारायण चोपडे, शेतकरी, भर जहांगीर, जि. वाशीम 

हार्वेस्टरच्या साह्याने गहू काढण्यासाठी एकरी दीड हजारांचा खर्च लागतो. महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड झालेली आहे. सध्या एकाच वेळी पीक काढणीसाठी गर्दी होत आहे. 
- धर्मासिंग, हार्वेस्टर मालक


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...