agriculture news in Marathi farmer earns income form Earthworm manure Maharashtra | Agrowon

गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

वीटभट्टीच्या धंद्यात उधारी वाढली. त्यामुळे शेतीत सेंद्रिय खते वापरून पीक उत्पादन वाढविण्याचा प्रयोग केला.

सासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी वाढली. त्यामुळे शेतीत सेंद्रिय खते वापरून पीक उत्पादन वाढविण्याचा प्रयोग केला. यात गांडूळ खत व व्हर्मी वॉशचा पिकात वापर यशस्वी झाल्यानंतर तोच गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय अधिक वाढवला. त्यातून सासवड (ता. पुरंदर) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी सचिन गिरमे हे खर्च जाऊन वर्षाला १० लाख रुपये कमवीत आहेत. 

बोरावकेमळा रस्त्याशी गिरमेंची शेती आहे. यशस्वी प्रयोगातून ‘ग्रीन गोल्ड गांडूळ खत’ नावाने स्वतःच्या पडजागेत वर्षापूर्वी प्रकल्प उभारला. १८ फूट लांबी, ६ फूट रुंदी, २ फूट उंचीच्या २० टाक्‍या विटा-सिमेंटमध्ये बांधून वर शेडही बांधले. साडेतीन लाख खर्च आला. टाकीत गावरान गायीचे शेण टाकून ओलावा करून थंडावा झाला, की आयसेनिया फोटिडा जातीचे गांडूळ सोडले.

एका टाकीत चार टन शेण व साधारणतः कुट्टी करून पाला, पाचोळा टाकला जातो. एक टाकीतून २.५ ते तीन महिन्यात सुमारे अडीच टन गांडूळ खत मिळते. वर्षात चार वेळा या प्रमाणे २०० टन खतनिर्मिती होते. १० रुपये किलो प्रमाणे विक्री केली जाते. शिवाय २५ रुपये लिटरने २,५०० लिटर गांडूळ पाणी (वर्मीवॉश) विकले जाते. पाच ते पन्नास किलो दरम्यान विविध आकारानुसार बॅग पॅकबंद करून विकतात. 

या प्रकल्पासाठी गायीचे शेणखत एक रुपया किलो प्रमाणे विकत घेतले जाते. शेण भरणे, पाणी मारणे, खत चाळणे, वीज, वजनासह पॅकिंग, वाहतूक आदी कामे खर्चिक आहेत. स्वतः सचिनसह कुटुंबीय प्रकल्पात वेळ देतात, शिवाय एका कुटुंबातील चार जणांनाही रोजगार दिला. हा सारा खर्च वर्षाला १० लाखापर्यंत जातो. निव्वळ नफा म्हणून सुमारे १० लाख रुपये पहिल्या वर्षी मिळाले. याकामी सातारच्या पशुधन विकास अधिकारी अर्चना जठार-नेवसे, गडहिंग्लजचे दयानंद देसाई यांचे थेट मार्गदर्शन झाले. त्यातूनच हा प्रकल्प आज एमए., बी.एड. असलेल्या पत्नी उमादेवी गिरमे यांच्यासह कुटुंबाचा आधार झालाय.

 
प्रतिक्रिया
घरी ३० वर्षांची ५० झाडांची चिकूची बाग असून, काही झाडांना घरचे गांडूळ खत टाकले. हंगामात फळझाडांचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढले आहे. फळांचा आकारही २२५ ग्रॅमपर्यंत वाढला आहे. फळबागेत केवळ गांडूळ खत, वर्मीवॉशच्या वापराने उत्पादनात चांगली वाढ मिळाली. संपूर्ण शेतीत गांडूळ खताचा वापर सुरू केला. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी गांडूळ खताचे ग्राहक झाले आहेत. लोकांची मागणी वाढत आहे. 
- सचिन गिरमे, युवा शेतकरी, संपर्क - ९९२२५५८०५९


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...