agriculture news in marathi, Farmer earns more after direct marketing of Santra, Orange, Varud, Amravati, Maharashtra | Agrowon

थेट विक्री करून संत्र्याला मिळविला ४० रुपये दर

विनोद इंगोले 
रविवार, 13 डिसेंबर 2020

दरातील घसरणीमुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. अशातच वरुड तालुक्‍यातील शेतकारी चिन्मय फुटाणे यांनी संत्र्याचे थेट मार्केटिंग करीत सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळविला आहे

अमरावती : दरातील घसरणीमुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. अशातच वरुड तालुक्‍यातील शेतकारी चिन्मय फुटाणे यांनी संत्र्याचे थेट मार्केटिंग करीत सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळविला आहे. या वर्षी चांगला दर आणि ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी २५ ते ३० टन संत्र्याची थेट विक्री करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

संत्रा फळाच्या सालीवर संततधार पावसामुळे अपेक्षित रंगधारणा सुरुवातीला झाली नाही. त्यानंतर देशाच्या इतर भागांत देखील पाऊस लांबला, परिणामी संत्रा फळांना मागणी नव्हती.  त्याचा परिणाम दरावर झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली.

आंबिया बहराचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने संत्रा तोडणीलाही महाग झाला आहे. सात ते दहा रुपये किलो या दराने संत्र्याची खरेदी होत आहे. परंतु वरुड तालुक्यातील रवाळा गावचे चिन्मय फुटाणे यांनी थेट मार्केटिंगच्या माध्यमातून खर्च वजा जाता चाळीस रुपये किलोचा दर मिळविला आहे. 

चिन्मय फुटाणे यांची पाच एकर संत्रा लागवड आहे. त्यातील अडीच एकर हलकी, तर अडीच एकर भारी जमीन. या वर्षी पावसाची संततधार सुरू असल्याने हलक्या जमिनीवरील बागेत आंबिया बहराची फळधारणा झाली. साडेसहा टन फळांची उत्पादकता अडीच एकरांतून झाली.

चिन्मय फुटाणे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासोबतच त्यांचे वडील वसंतराव फुटाणे हे गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय शेतीमाल उत्पादन करतात. संत्रा बागेचे व्यवस्थापनदेखील गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने होत आहे. त्यामुळे त्यांची सर्वदूर सेंद्रिय शेतीमाल उत्पादक अशी ओळख आहे. 

सोशल मीडियावर देखील फुटाणे कुटुंबीय सक्रिय आहे. आपल्या बागेतील सेंद्रिय संत्रा उत्पादनाची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पसरविली. त्या माध्यमातून त्यांना सहज ग्राहक मिळाले. फळाचा दर्जा पाहून ९० ते ६० रुपये किलो याप्रमाणे संत्रा विक्री करण्यात आली. खर्च वजा जाता त्यांना ४५ ते ५० रुपये सरासरी मिळाले. 

एसटी पार्सल, रेल्वे तसेच खासगी बस या माध्यमांतून संत्रा वाहतूक करण्यात आली. त्याचा खर्च ग्राहकांकडून घेण्यात आला. लाकडी बॉक्समधून संत्रा ग्राहकांना पाठविण्यात आला. या वर्षी ग्राहकांचा थेट मार्केटिंगला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी २५ ते ३० टन संत्रा देशाच्या विविध भागांत पाठवण्याचा मनोदय चिन्मय फुटाणे यांनी व्यक्त केला. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनादेखील ते करणार असून, त्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांचा संत्रा देखील थेट विकण्यावर भर दिला जाणार आहे.

या वर्षी पाऊस लांबल्याने उत्पादकता प्रभावित झाली. साडेसहा टन अडीच एकरांतून उत्पादन झाले. पाच टन १७० किलो फळांची विक्री थेट केली आहे, त्या माध्यमातून दोन लाख ४० हजार रुपये उत्पन्न झाले. बाजारात दहा रुपये किलोचा दर असताना आम्हाला मात्र थेट मार्केटिंगच्या माध्यमातून सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळाला आहे. 
- चिन्मय फुटाने, शेतकरी, रवाळा, ता. वरूड, जि. अमरावती
contact : 9923231149


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...