Agriculture news in marathi the farmer expressed his grief through a caricature | Agrowon

सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने व्यंगचित्रातून मांडली व्यथा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

सद्यःस्थितीतील शेतकऱ्यांसमोरील अडचणींचे वास्तव देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथील प्रयोगशील शेतकरी किरण मोरे यांनी आपल्या कुंचल्यातून मांडत सांगा साहेब, खरीप कसा पेरू? असा सवाल कृषिमंत्र्यांसह व्यवस्थेला केला आहे. 

नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची कुऱ्हाड, अवकाळीचा मार, त्यात आता झालेल्या गारपिटीच्या जखमा ओल्या आहेत. शेतमालाची झालेली नासाडी अन् त्यास वाचलेल्या शेतमालास मिळत नसलेला बाजारभाव, यामुळे शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यातच आता कोरोना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांभोवती घोंघावत आहे. त्यातच आता खरीप तोंडावर असताना उभे राहण्यासाठी भांडवल आणायचे कोठून, अन् पेरा कसा करायचा हा प्रश्न उभा आहे. या सद्यःस्थितीतील अडचणींचे वास्तव देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथील प्रयोगशील शेतकरी किरण मोरे यांनी आपल्या कुंचल्यातून मांडत सांगा साहेब, खरीप कसा पेरू? असा सवाल कृषिमंत्र्यांसह व्यवस्थेला केला आहे. 

मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून आजपर्यंत विविध संकटांची मालिका शेतकऱ्यांच्या मागे कायम आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कधी अस्मानी, कधी व्यवस्थेचा, तर कधी धोरणांचा बळी पडत असल्याची गंभीर स्थिती आहे. सरकार, विरोधी पक्ष, शासकीय यंत्रणा मदतीसाठी दिसेना अन् त्यातच अडचणी वाढत असताना कुणीही शेतकऱ्यांचे ऐकेना, त्यामुळे मुस्कटदाबी होत असल्याची सद्यःस्थिती या रेखाटनातून किरण यांनी मांडली आहे. 

मागील वर्षाच्या दुष्काळाच्या संकटातून सावरल्यानंतर आता कुठे हाती शेतमाल आला तर व्यापारी कमी भावात खरेदी करून लूट करत आहेत. बाजार समित्या कधी सुरू तर कधी बंद अशी स्थिती आहे. त्यात सरकारी खरेदीही बंद आहे. अशा अडचणीत शेतकरी सापडला असताना शेतकऱ्याने काय करायचं असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

‘शेतकऱ्यांसाठी कुणीच का धावून येईना’ 
सरकारने एकीकडे घोषणा केली की, शेतकऱ्यांना लॉकडाऊनमधून सूट दिल्याची घोषणा केली. मात्र, खरिपाच्या तोंडी हाती भांडवल नसल्याने अन् शेतमालाला रास्त दर मिळत नसल्याने शेतकरी अद्यापही ‘लॉकडाऊन’ आहे. अशा अडचणींच्या काळात सरकारने निर्णय जाहीर करून पुढे जलद कार्यवाहीविना कामकाज थांबले आहे. तर विरोधी पक्ष झोपल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी असणारे कृषी व पणन विभाग त्यांच्याच कामात दंग आहेत. मग शेतकऱ्यांसाठी ते धावून कधी येणार असा उद्विग्न सवाल रेखाटलेल्या चित्रातून सत्ताधारी पक्ष, विरोध पक्ष, कृषी व पणन विभागाच्या कामकाजाच्या स्थितीचे वास्तव मांडून शेतकऱ्याची परिस्थिती मांडली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...