सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले परत

The farmer found five thousand rupees in return
The farmer found five thousand rupees in return

सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला असल्याचे जागोजागी दिसत असले तरीही एखाद्याला सापडलेला ऐवज प्रामाणिकपणे परत करण्याच्या घटनाही समोर येत असल्याने नैतिकता शिल्लक असल्याची ही पावतीच समजावी लागेल. याचीच प्रचिती सुलतानवाडी (ता. कोरेगाव) येथील कष्टाळू शेतकरी शरद फडतरे आणि संतोष साप्ते यांनी दिली. बाजारात सापडलेले पाच हजार रुपये त्यांनी संबंधित शेतकऱ्यास परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत माहिती अशी, की साताऱ्यात जिल्हा बाजार समितीसमोर दररोज भाजीपाल्याच्या बाजार भरत असतो. सकाळी सहापासूनच या बाजारात नागरिकांची ताजा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. या शेतकरी बाजारात भाजीपाला विकावयास आलेल्या शेतकरी शरद फडतरे व संतोष साप्ते यांना पाच हजार रुपये सापडले. त्यांच्या प्रमाणेच खुशी (ता. सातारा) येथील शेतकरी बाळासाहेब गुलाबराव साळुंखे हे शेतीमाल विक्रीसाठी आले होते. शेतीमाल विकून आलेले पाच हजार रुपये गडबडीत बाजारात पडले. हे पैसे श्री. फडतरे आणि श्री. साप्ते यांना सापडले होते. ते कोणाचे आहेत, याचा शोधही ते घेत होते. त्या वेळी श्री. साळुंखे हे पैसे कोठे पडले याचा शोध घेत असल्याचे समजताच खात्री करून श्री. फडतरे आणि श्री. साप्ते यांनी सापडले पैसे त्यांना परत केले. 

कष्टाचे पैसे परत मिळाल्याने श्री. साळुंखे यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. या प्रामाणिकपणा बद्दल शेतकरी बाळासाहेब साळुंखे, जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, बाजार समितीचे कर्मचारी आणि उपस्थित सातारकरांनी शरद फडतरे व विठ्ठल साप्ते या प्रामाणिक शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. शरद फडतरे हे प्रगतिशील शेतकरी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com