संकटासोबत चालून आली संधी, बटेरची होतेय विक्रमी विक्री

अकोला जिल्ह्यातील खडका येथील गजानन डाबेराव यांचा हा व्यवसाय कमालीचा वधारला असून दिवसाला ३०० ते ४०० पक्षी विकल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर वर्षभरात हा व्यवसाय सहा लाख पक्षांपर्यंत राहिल्याचे ते म्हणाले.
संकटासोबत चालून आली संधी, बटेरची होतेय विक्रमी विक्री
संकटासोबत चालून आली संधी, बटेरची होतेय विक्रमी विक्री

अकोला :  सध्या सर्वत्र शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे. मात्र, अशाही स्थितीत बटेरपालनाला चांगलेे दिवस आले आहेत. जिल्ह्यातील खडका येथील गजानन डाबेराव यांचा हा व्यवसाय कमालीचा वधारला असून दिवसाला ३०० ते ४०० पक्षी विकल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.  तर वर्षभरात हा व्यवसाय सहा लाख पक्षांपर्यंत राहिल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या काळात पोल्ट्रीबाबत पसरलेल्या अफवांनी हा व्यवसाय संपूर्णपणे काही दिवस रसातळाला गेला होता. अनेक भागात अद्यापही सावरलेला नाही. आता लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विविध अडचणींचा सामना पोल्ट्री उद्योगात करावा लागतो आहे. अकोला जिल्ह्यातील गजानन डाबेराव यांच्यासाठी तितर बटेर पालनाला व्यवसाय कमालीचा फायदेशीर ठरला आहे. प्रामुख्याने सध्याच्या काळात पोल्ट्रीला अवकळा आलेली असताना तितर बटेरची मागणी उच्चांकी तयार झाली आहे. त्यामुळेच दिवसाला तिनशे ते चारशे पक्षी विकत असल्याचे ते भरभरून सांगत होते.  तितर बटेर हा पक्षी मासांहारीना अधिक आवडतो. रानावनात आढळणारा हा पक्षी आता कुक्कुट पालनाच्या धर्तीवर व्यावसायिक स्वरुपात पाळल्या जाऊ लागला आहे. या भागात या व्यवसायाला वलय तयार करण्याचे काम गजानन डाबेराव यांनी केले आहे. अकोला-मूर्तिजापूर या तालुक्यांच्या सीमेवरील त्यांचे हजार लोकवस्तीचे खडका नावाचे गाव आहे.   डाबेराव यांनी कुटुंबाच्या पारंपारिक शेतीला बटेर पालनाची जोड देत सात वर्षांपूर्वी त्यांनी दहा कोंबड्यांचे पालन करीत या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर या व्यवसायात चांगली संधी असल्याचे पटल्याने त्यांनी सोबतीला बटेर पालन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी अंड्यापासून पिल्ले उबवण्यासाठी हॅचरी मशिनचा वापर सुरु केला.  आपल्या व्यवसायाला हवे असलेले व आपल्या भागाला पूरक ठरेल असे एक नवीन हॅचरी मशीन त्यांनी तयार करून घेतली. बटेर पक्षाला मांसाहारींकडून मागणी वाढत आहे. प्रामुख्याने सध्या मांसाहारींना इतर पर्याय उपलब्ध होत नसल्याने हे तितर बटेर पक्षी अधिक आवडीचे झाले आहेत. डाबेराव यांच्या घरूनच दिवसाला ३०० ते ४०० पक्षी विकल्या जात आहेत. ६० रुपये पक्षाप्रमाणे ते विक्री करीत आहेत. चाहूल ओळखून केले नियोजन कोरोनामुळे पुढील काळात स्थिती बिघडण्याची चिन्हे आहेत, याची दिशा ओळखून आपण दोन गाड्या पशुखाद्य भरून ठेवले. गेल्या काही दिवसात लॉकडाऊन मुळे वाहतूक ठप्प झालेली असल्याने अनेकांना पशुखाद्य मिळालेले नाही. मात्र आपण आधीच भरून ठेवल्याने कुठलीही अडचण तयार झालेली नाही. उलट दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात बंद राहणारा हा आपला हा व्यवसाय यंदा ग्राहकांच्या प्रचंड मागणीमुळे सुरु ठेवावा लागत आहे.  शिवाय आपल्यासोबत आता विविध ठिकाणी जवळपास १४० पेक्षा अधिक शेतकरी बटेर व गावरान कोंबडी पालनामध्ये उतरले आहेत. या पशुपालकांनाही संकटाच्या काळात पशुखाद्य दिले.  - गजानन डाबेराव, मो. ९६५७१४५८७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com