थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍न

या सर्व कामात जास्तीचे कष्ट आहेत आणि थोडा थोडा माल विक्री करावा लागतो. त्यामुळे अनेकजण अस करणे टाळतात. परंतु प्रसंगावधान राखून निर्णय घ्यायाला हवे. - राजेश इंगळे, शेतकरी, माटेगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
chilli
chilli

औरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कन्नड तालुक्यातील माटेगावचे शेतकरी राजेश लक्ष्मणराव इंगळे यांनी मार्ग शोधला आहे. त्यांनी आपल्याकडील वाळलेली मिरची थेट ग्राहकांना विक्री केली तर शेवगा शेंगाची विक्री न करता बियाणे काढून विक्री करण्याचे ठरविले आहे. 

माटेगाव येथील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेश इंगळे यांच्या एकत्रित कुटुंबाची वेरुळ येथे २५ एकर बागायती शेती आहे. या शेतीत  मोसंबी, पेरू, चिकू, आंबा, रामफळ,  सीताफळ, हनुमान फळ व तसेच आले, कांदा, मिरची, डांगर, शेवगा, पपई, व इतर भाजीपाला अशी सर्व प्रकारची पिके ते घेतात. त्यांना बाजारभावाची अडचण त्यांना असते. यावर मात करण्यासाठी श्री इंगळे यांनी स्वतः व्हाट्सअप फेसबुकवर विक्रीयोग्य शेतमालाची जाहिरात टाकून घरपोच ऑर्डर पोहचविण्याचे काम दोन वर्षांपासून करत आहेत. तसेच या विक्रीनंतर अतिरिक्त ठरणारा शेतमाल व्यापाऱ्यांशी संपर्क करून विक्री करतात.  मिरचीसाठी ठरला अवघड काळ... श्री. इंगळे म्हणाले, कि मागील दोन तीन महिन्याचा काळ मिरची पिकासाठी अतिशय कठीण गेला. सात-आठ रुपये किलोने हिरवी मिरचीची विक्री चालू होती. तोडणी आणि वाहतुकीसही मिरची परवडत नव्हती. मग मिरची वाळवून विक्री करण्याचा निर्णय घेतला. मिरची वाळल्यानंतर विक्रीसाठी अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. बहुतेक व्यापारी ६० ते ७० रुपये किलोच्या पुढे दर द्यायला तयार नव्हते. परंतु किरकोळ बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत विक्री चालू होती. मग स्वतःच व्हाट्सॲप फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात केली. ग्राहकांचेही हित जपून सरसकट १०० रुपये किलो प्रमाणे घरपोच विक्री चालू केली. त्यातच कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यातही जवळपास सहा क्विंटल वाळलेली मिरची पॅकिंग करून घरपोच शंभर रुपये प्रमाणे दिली. आता उरलेल्या ७० ते ७५ किलो मिरचीच्या विक्रीचे काम सुरू आहे. शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या प्रयत्नात ग्राहकांचा पन्नास ते सत्तर रुपयाचा किलोमागे फायदा झाला व माझाही ३० रुपये फायदा झाला. शेवग्याचे बी धरण्याचा निर्णय जवळपास अर्धा एकर शेततळ्याच्या भोवताल लावलेल्या शेवग्याच्या उत्पादित शेंगा वेरूळ ते औरंगाबाद रोडवरील प्रत्येक हॉटेलला ५० ते ८० रुपये किलो प्रमाणे विक्री करत होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे विक्री बंद झाली. त्यावर पर्याय म्हणून आपण गतवर्षीप्रमाणे यंदाही शेवग्याच्या शेंगा वाळवून त्याच्या बियाण्याचे उत्पादन व विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. इंगळे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com