agriculture news in Marathi farmer got extra rate by direct selling Maharashtra | Agrowon

थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍न

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

या सर्व कामात जास्तीचे कष्ट आहेत आणि थोडा थोडा माल विक्री करावा लागतो. त्यामुळे अनेकजण अस करणे टाळतात. परंतु प्रसंगावधान राखून निर्णय घ्यायाला हवे.
- राजेश इंगळे, शेतकरी, माटेगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

औरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कन्नड तालुक्यातील माटेगावचे शेतकरी राजेश लक्ष्मणराव इंगळे यांनी मार्ग शोधला आहे. त्यांनी आपल्याकडील वाळलेली मिरची थेट ग्राहकांना विक्री केली तर शेवगा शेंगाची विक्री न करता बियाणे काढून विक्री करण्याचे ठरविले आहे. 

माटेगाव येथील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी राजेश इंगळे यांच्या एकत्रित कुटुंबाची वेरुळ येथे २५ एकर बागायती शेती आहे. या शेतीत  मोसंबी, पेरू, चिकू, आंबा, रामफळ,  सीताफळ, हनुमान फळ व तसेच आले, कांदा, मिरची, डांगर, शेवगा, पपई, व इतर भाजीपाला अशी सर्व प्रकारची पिके ते घेतात.

त्यांना बाजारभावाची अडचण त्यांना असते. यावर मात करण्यासाठी श्री इंगळे यांनी स्वतः व्हाट्सअप फेसबुकवर विक्रीयोग्य शेतमालाची जाहिरात टाकून घरपोच ऑर्डर पोहचविण्याचे काम दोन वर्षांपासून करत आहेत. तसेच या विक्रीनंतर अतिरिक्त ठरणारा शेतमाल व्यापाऱ्यांशी संपर्क करून विक्री करतात. 

मिरचीसाठी ठरला अवघड काळ...
श्री. इंगळे म्हणाले, कि मागील दोन तीन महिन्याचा काळ मिरची पिकासाठी अतिशय कठीण गेला. सात-आठ रुपये किलोने हिरवी मिरचीची विक्री चालू होती. तोडणी आणि वाहतुकीसही मिरची परवडत नव्हती. मग मिरची वाळवून विक्री करण्याचा निर्णय घेतला. मिरची वाळल्यानंतर विक्रीसाठी अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. बहुतेक व्यापारी ६० ते ७० रुपये किलोच्या पुढे दर द्यायला तयार नव्हते. परंतु किरकोळ बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत विक्री चालू होती.

मग स्वतःच व्हाट्सॲप फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात केली. ग्राहकांचेही हित जपून सरसकट १०० रुपये किलो प्रमाणे घरपोच विक्री चालू केली. त्यातच कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यातही जवळपास सहा क्विंटल वाळलेली मिरची पॅकिंग करून घरपोच शंभर रुपये प्रमाणे दिली. आता उरलेल्या ७० ते ७५ किलो मिरचीच्या विक्रीचे काम सुरू आहे. शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या प्रयत्नात ग्राहकांचा पन्नास ते सत्तर रुपयाचा किलोमागे फायदा झाला व माझाही ३० रुपये फायदा झाला.

शेवग्याचे बी धरण्याचा निर्णय
जवळपास अर्धा एकर शेततळ्याच्या भोवताल लावलेल्या शेवग्याच्या उत्पादित शेंगा वेरूळ ते औरंगाबाद रोडवरील प्रत्येक हॉटेलला ५० ते ८० रुपये किलो प्रमाणे विक्री करत होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे विक्री बंद झाली. त्यावर पर्याय म्हणून आपण गतवर्षीप्रमाणे यंदाही शेवग्याच्या शेंगा वाळवून त्याच्या बियाण्याचे उत्पादन व विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. इंगळे म्हणाले.

 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...