agriculture news in Marathi farmer got property right for red ladies finger Maharashtra | Page 2 ||| Agrowon

लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे स्वामित्व प्रमाणपत्र

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला) येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभुआजगावकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडी वाणाच्या संशोधनाला केंद्र शासनाने स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला) येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभुआजगावकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडी वाणाच्या संशोधनाला केंद्र शासनाने स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे. गेली चौदा वर्ष ते लाल भेंडीच्या संशोधनाचे काम करीत असून सहा वर्षांपूर्वी त्यांनी केंद्र सरकारकडे स्वामित्व प्रमाणपत्राकरिता अर्ज केला होता.

जिल्ह्यात साधारणपणे हिरवी आणि सफेद भेंडी या दोन जाती पाहायला मिळतात. मूळ आजगाव येथील शेतकरी श्री. प्रभुआजगावर (सध्या रा.आडेली ता.वेंगुर्ला) यांनी पंधरा वर्षापूर्वी आपल्या शेतात भेंडी लागवड केली होती. यावेळी त्यांना काही भेंडीवर थोडाफार लालसर रंग आल्याचे दिसून आले. त्यांनी अशा रंगाच्या भेंडीवर संशोधन केले. त्यानंतर निवड पध्दतीने पूर्ण लालसर रंगाच्या भेंडीची जात विकसित केली.

स्वतःच्या शेतात त्यांनी भेंडीची लागवड करून पीक घेतले. अनेक प्रयोग यशस्वी केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भारत सरकारच्या वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरणाकडे स्वामित्व प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केला होता. या विभागाने देशभरात लाल भेंडीच्या विविध चाचण्या केल्यानंतर श्री. प्रभुआजगावकर यांना स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे.

श्री. प्रभुआजगावर यांनी विकसित केलेल्या भेंडीचा रंग लालसर असून त्यांची लांबी ७ ते ८ इंच आहे. या भेंडीमध्ये चिकटपणा कमी असून लालसर रंगामुळे बाजारपेठेत त्याला मागणी मोठी आहे. प्रती झाड एक ते दीड किलो उत्पन्न मिळते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा आहे.

या पिकाची काढणी ४० ते ५० दिवसांनी होते. देशातील काश्मीरचा अतिथंड भाग वगळता देशभरात कुठेही या भेंडीची लागवड करता येणार आहे. कोणत्याही हंगामात या भेंडीची लागवड करता येईल.

वेंगुर्ला फळसंशोधन केंद्रात समारंभपूर्वक श्री. प्रभुआजगावकर यांना स्वामित्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला  फळसंशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन. सावंत, समाजकल्याणचे उपआयुक्त प्रमोद जाधव, डॉ. विजयकुमार देसाई हे उपस्थित होते. स्वामित्व प्रमाणपत्र नोंदणीकरीता कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ,व्ही.व्ही. दळवी, डॉ. पराग हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.


इतर अॅग्रो विशेष
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...