agriculture news in Marathi, farmer had ploughing over crop in naded, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी फिरवला उभ्या पिकावर नांगर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

विविध माध्यमांतून तसेच अर्ज, निवेदन देऊनही खरी पैसेवारी शासन प्रशासनाला कळाली नाही. झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आमचे दु:ख वाजत गाजत व्यक्त करत आहोत.
- ज्ञानेश्वर गिते, शेतकरी

माळकोळी, जि. नांदेड : खरीप पिकांचे उत्पादन कमी आले असतानाही महसूल प्रशासनाने पैसेवारी ५१ पैसे आल्याचे जाहीर केले. त्यातही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १३) गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत शेतातील सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला. 

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. यावर्षीही अनियमित पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, पूर्णपणे तर कापूस आणि तूर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न निम्याहून कमी येत आहे.

एकरी १५ ते १८ हजार रुपये उत्पादन खर्च आला असून, उत्पन्न मात्र एकरी दीड ते दोन क्विंटल झाले. यामुळे शिवारातील सुमारे १०० एकर जमिनीवरील सोयाबीन पिकाची काढणी न करताच नांगर फिरवला. तरीही प्रशासनाने गावशिवारीतील खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैसे काढली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ वाजंत्री लावून वाजत गाजत शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवला.

सोमवारी (ता. १३) सकाळी १० वाजता शेतकरी मोठ्या संख्यने माळाकोळी येथील शिवाजी चौकात एकत्र आले. तेथून वाजत गाजत मोहन शूर यांच्या शेतात जाऊन उभ्या सोयाबीन पिकात नांगर फिरवण्यात आला. यानंतर परत येऊन शिवाजी चौकामध्ये माळाकोळी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

या उपोषणाला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दत्ता पवार, शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे, सभापती पंडित देवकांबळे, शिवाभाऊ नरंगले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय मोहन शूर, अशोक जायभाये, देवासिंह बयास, संजय नागरगोजे, विठ्ठल जेलेवाड,  मारोती कागणे, आदिनाथ मुस्तापुरे, चंदुदेव जोशी, व्यंकटराव पवार, एकनाथ पवार, अंगद गिते, राम पवार, उत्तम घुगे, लहू तिडके, बंडू केंद्रे, लक्ष्मण पुरी, सचिन पवार, दीपक कागणे या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया
पाच बॅग सोयाबीन पेरलं. एकरी पंधरा हजार रुपये खर्च केला; मात्र पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पूर्णपणे वाया गेले. काढणीच्या खर्चात पडायचे कशाला म्हणून आम्ही उभ्या पिकावर नांगर फिरवला.
- बंडू केंद्रे, शेतकरी

भरमसाठ खर्च होऊनही अनियमित पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी ही पिके पूर्णपणे गेली आहेत. मग काढणी मळणीचा खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.
- व्यंकटकराव पवार, शेतकरी

पीक पैसेवारीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुलर्क्ष करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागत आहे. 
- जालिंदर कागणे, सरपंच, माळकोळी, जि. नांदेड


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...