agriculture news in Marathi farmer information center in orange belt Maharashtra | Agrowon

संत्रा पट्ट्यात रेल्वेचे शेतकरी माहिती केंद्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेचा स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध करून देण्याच्या नितीन गडकरी यांच्या सूचनेची दाखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.

नागपूर: संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेचा स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध करून देण्याच्या नितीन गडकरी यांच्या सूचनेची दाखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्या अंतर्गत  संत्रापट्ट्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु रेल्वेने शेतमाल पाठवण्यासाठी किती दर आकारले जातात त्याकरिता बुकिंग कसे करावे अशी प्राथमिक माहिती देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाही.  त्यामुळे रेल्वे प्रशासनाने शेतमाल वाहतुकी करता रोडमॅप तयार करावा.  त्यासोबतच शेतमाल वाहतूक नोंदणी करता येईल व अंतरनिहाय दराची माहिती उपलब्ध असेल असे संकेतस्थळ विकसित करावे असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात संत्रा उत्पादकांच्या सुविधे करता रेल्वे प्रशासनाच्या वतीने संत्रापट्ट्यातील बहुतांश रेल्वेस्थानकांवर माहिती केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

चार ठिकाणी असलेल्या या केंद्रावर प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कर्मचारी शेतकऱ्यांना संत्रा व इतर शेतमाल वाहतुकी संदर्भाने उद्भवणाऱ्या शंकांचे समाधान करण्यास मदत करणार आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात हे माहिती केंद्र सुरू राहील.  यामाध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या वतीने त्यांच्या स्तरावर संत्रा वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे.  याला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आयात शुल्क कमी करा
नागपुरी संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते. परंतु बांगलादेश सरकारने त्यांच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे.  चाळीस रुपये प्रति किलो याप्रमाणे आयात शुल्काची आकारणी होते. संत्रा दरापेक्षा आयात शुल्क अधिक असल्याने ते कमी करावे अशी मागणी आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे या संदर्भाने अपेडा ने पाठपुरावा करावा, अशी या भागातील संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे.

संत्र्याची पहिली खेप छत्तीसगडला
दरम्यान अजय जोरांडे  नामक शेतकऱ्याने आंबिया बहारातील संत्र्यांचे पहिले पार्सल रेल्वेच्या माध्यमातून पाठविले आहे.  नागपूर वरून बुकिंग करून हे पार्सल छत्तीसगडमधील टाटानगरला पाठवण्यात आले.  ९.६९ क्विंटल वजनाच्या  या पार्सल करता ९४९ किलोमीटर  अंतरासाठी २४५७ रुपये आकारण्यात आले आहेत. 

या स्थानकावर आहेत माहिती केंद्रे

  • पांढूर्णा
  • वरुड
  • नरखेड
  • काटोल

इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...