शेतकरी नियोजन- कापूस

माझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२ दिवसांचे झाले आहे. सद्यःस्थितीत झाडाची उंची १ ते २ फुटांपर्यंत झाली आहे. आत्तापर्यंत खताचे दोन हप्ते दिले आहे.
Nanote has used pheromone traps in the cotton crop.
Nanote has used pheromone traps in the cotton crop.

माझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२ दिवसांचे झाले आहे. सद्यःस्थितीत झाडाची उंची १ ते २ फुटांपर्यंत झाली आहे. आत्तापर्यंत खताचे दोन हप्ते दिले आहे.

पीक-  कापूस शेतकरी-  गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला क्षेत्र-  १२ एकर माझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२ दिवसांचे झाले आहे. सद्यःस्थितीत झाडाची उंची १ ते २ फुटांपर्यंत झाली आहे. आत्तापर्यंत खताचे दोन हप्ते दिले आहे. पिकाचा विकास फळ, फांद्या, योग्य दिशेने होत आहे. दुसऱ्या डोसमध्ये एकरी एक बॅग १०ः२६ः२६, युरिया २२ किलो आणि ५ किलो सल्फर दिले. शिफारशींपैकी उर्वरित खतांचा तिसरा डोस ६० व्या दिवशी देण्याचे नियोजन आहे. काही क्षेत्राला मजुराद्वारे, तर काही भागात डवरणीला सरते बांधून खत दिले.

  • सततच्या पावसामुळे शेताला डवरणी शक्य होत नाही. शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी काही क्षेत्रावर रासायनिक पद्धतीने तर काही क्षेत्रामध्ये मजुरांद्वारे निंदण केले. रासायनिक तणनाशकाच्या वापरामुळे इतर तणांसोबत रुंद पानाच्या केणा तणावर चांगले नियंत्रण मिळाल्याचे दिसून आले.
  • झाडातील दोन ओळीतील अंतर कमी आहे. त्यामुळे शाकीय वाढ थांबवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी उघडीप मिळताच वाढरोधकाची फवारणी करणार आहे.
  • कापूस पिकाच्या पानाचे दुर्बिणीद्वारे निरीक्षण केले असता यावर्षी प्रथमच सुरुवातीला फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला. सध्या प्रतिपान तीन ते पाच फुलकिड्यांची संख्या आहे. तुडतुडे कमी प्रमाणात दिसतात. सुरुवातीपासूनच रसशोषक किडी व अळ्यांसाठी निंबोळी अर्काचा वापर करत आहे. त्यासाठी पाच किलो निंबोळी पावडर रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी गाळून त्याचा वापर करतो. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा लागेल.
  • मागील तीन वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी यावर्षी सुरुवातीपासून काळजी घेत आहे. माझ्या शेतावर एकरी चार कामगंध सापळे लावले आहेत. सापळ्यामध्ये मागील ४८ तासात एकही पतंग आढळून आला नाही. त्यामुळे मला सध्या तरी अंडी अथवा अळी नियंत्रणासाठी फवारणीची गरज वाटत नाही. मात्र, सातत्याने पिकाचे व पानांचे निरीक्षण करत आहे. पेरणीपासून ५५ ते ६० व्या दिवसादरम्यान रासायनिक कीटकनाशकांची एखादी फवारणी घ्यावी लागेल. त्यासाठी तयारीत आहे.
  • सतत पाऊस सुरू राहिल्यास खोलगट भागात पाणी साचून मर होते. हा मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून ताम्रयुक्त बुरशीनाशक आणि १९ः १९ः १९ या विद्राव्य खताची आळवणी करणार आहे.
  • शेतातील बांधाजवळ आणि झाडाखाली मिलीबगचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सज्ज आहे.
  • संपर्क - गणेश शामराव नानोटे, ९५७९१५४००४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com