Agriculture news in marathi Farmer Planning- Emphasis on fertilizer management in cotton crop | Agrowon

शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत व्यवस्थापनासह दिली भर

गणेश शामराव नानोटे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून अपेक्षित वाढ झाली आहे. वेगवेगळ्या जातिनिहाय पातील, फुले, बोंडे योग्य प्रमाणात दिसून येत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा आहे.
 

सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून अपेक्षित वाढ झाली आहे. वेगवेगळ्या जातिनिहाय पातील, फुले, बोंडे योग्य प्रमाणात दिसून येत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा आहे.

सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून अपेक्षित वाढ झाली आहे. वेगवेगळ्या जातिनिहाय पातील, फुले, बोंडे योग्य प्रमाणात दिसून येत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा आहे.

आतापर्यंत खताचे दोन हप्ते देऊन झाले आहेत. खताचा तिसरा हप्ता एकरी एक बॅग पोटॅश, एक बॅग युरीया, १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट देत आहे. जास्त वाढलेल्या कपाशीत युरीया ऐवजी अमोनियम सल्फेट वापरत आहे. पिकाची वाढ चांगली असल्यामुळे यानंतर डवरणी करता येणार नाही. यासाठी औताला दोरी बांधून पिकाला नुकतीच भर दिली. खत व्यवस्थितरीत्या मातीआड दाबले जाईल, याकडे लक्ष दिले. कापूस पिकास भर दिल्यामुळे दुहेरी फायदा होतो. जास्त पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाणी वाहून जाते. पावसाला खंड पडल्यास, ताण बसल्यास भरीमुळे वापसा धरून ठेवला जाऊ शकतो.

मी ४० व्या दिवशी पिकामध्ये एकरी चार कामगंध सापळे लावले होते. मात्र, त्यामध्ये आतापर्यंत एकही पतंग आढळला नाही. शेतात फिरताना एक-दोन पतंग आढळले. त्यापासून नुकसान दिसून आले नाही. कामगंध सापळ्यामध्ये लावलेले ल्युर २० दिवस झाले. आणखी १० दिवसांनी ल्युर बदलावे लागतील. त्याचे नियोजन केले आहे. सुमारे १० दिवसापूर्वी कपाशी पिकामध्ये काही ठिकाणी मावा, फुलकिडे, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्याकरिता निंबोळी अर्काची पहिली फवारणी घेतली होती. आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी लवकरच दुसऱ्या फवारणीचे नियोजन आहे. यावर्षी दरवर्षीच्या मानाने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी जाणवत आहे. फवारणीसाठी मी नेहमी योग्य निदान, योग्य कीटकनाशक, योग्य मात्रा आणि योग्य वेळ या चार सूत्रांची काटेकोर अंमलबजावणी करतो.

  • - शेताच्या काही भागात गवतवर्गीय तणाची अधिक उगवण झाली होती. त्यासाठी तणनियंत्रणाचे उपाय राबवले.
  • - अमावस्येच्या रात्री पतंगांची अंडी घालण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन सर्वेक्षण करून व सापळ्यातील पतंगांची संख्या पाहून योग्य त्या अंडीनाशक व अळीनाशकाचा वापर करावा लागणार आहे. त्याचे नियोजन सुरू केले आहे.

संपर्क- गणेश शामराव नानोटे, ९५७९१५४००४


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...