agriculture news in marathi Farmer Planning for Sorghum Crop | Agrowon

शेतकरी नियोजन पीक - ज्वारी

सुदर्शन सुतार
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे.
 

ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे.

शेतकरी ः संतोष बळिराम काटमोरे
गाव ः पिंपरी (सा), ता. बार्शी, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र ः पाच एकर
ज्वारी क्षेत्र ः एक एकर

पूर्वी ज्वारीसाठी घरगुती बियाणे वापरत होतो. मात्र, उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षापासून सुधारित वाणाचा वापर सुरू केला आहे. ज्वारीच्या ‘फुले रेवती’ या सुधारित वाणाची ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली आहे. यामुळे ज्वारीतील अंतर योग्य राहण्यास मदत होते. बीजप्रक्रिया आणि पेरणी पद्धती महत्त्वाची ठरते. पुढे विरळणी करून रोपांची संख्या योग्य ठेवली.

ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे.

या वर्षीचे नियोजन 

 • ज्वारीच्या पेरणी आधी मशागत करून त्यात दोन ट्रॉली गावखत टाकले.
 • त्यानंतर २९ ऑक्टोबरला ज्वारीची पेरणी केली.
 • ट्रॅक्टरच्या साह्याने १८ इंचांवर ज्वारीचा पेरा केला.
 • तत्पूर्वी बुरशीनाशक आणि जैविक घटकांची बीजप्रक्रिया केली.
 • ट्रॅक्टरच्या साह्याने पेरल्यामुळे एकसारखे बी पडले.
 • या पेरणीमुळे दोन ओळीतील अंतर १८ इंच, दोन रोपातील अंतर ६ इंचापर्यंत राहिले.
 • ज्वारीसाठी सुधारित वाण फुले रेवतीचा वापर केला.
 • एकरी फक्त चार किलो बियाणे लागले.
 • पेरणीनंतर दहा दिवसांनी स्प्रिंकलरने आठ तासांपर्यंत पाणी दिले.
 • पुन्हा आणखी दहा दिवसांनी स्प्रिंकलरने आठ तासांपर्यंत पाणी दिले.
 • महिनाभराने ज्वारीची खुरपणी केली. दाट झालेल्या झाडांची विरळणी करताना ५-६ इंचावर एक रोप ठेवले.
 • ५० दिवसांनी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी केली.
 • त्यानंतर विद्राव्य खताची (१९ः१९ः१९) फवारणी केली.
 • ज्वारी मोठी झाल्यामुळे ६० व्या दिवशी पाटाने पाणी दिले.

आता पुढील पंधरा दिवसाचे नियोजन

 • सध्या ज्वारीला ८० दिवस झाले आहेत.
 • सध्या ती फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.
 • आता आणखी एक पाणी ठिबक संचाद्वारे साधारण महिनाअखेरपर्यंत देणार आहे.
 • या पाण्यासोबतच सल्फेट ऑफ पोटॅश (०ः०ः ५०) हे विद्राव्य खत दोन किलो प्रमाणे ठिबक संचातून देणार आहे.

संपर्क ः संतोष काटमोरे, ९९२३८६७०००
(शब्दांकन- सुदर्शन सुतार)


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...