agriculture news in Marathi farmer plough on crop Maharashtra | Agrowon

सोयाबीनची उगवण न झाल्याने जड अंतकरणाने पिकांवर नांगर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर कारणांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे.

अकोला ः बियाण्याचा दर्जा, पावसाचा खंड व इतर कारणांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी पहिल्या पेरणीवर नांगर फिरवून दुसऱ्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. पहिल्या पेरणीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांचा झाला असून, आता दुबार पेरणीसाठी तजवीज करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

अकोला शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कापशी शिवारात सिंदखेड येथील शेतकरी श्री. वानखडे यांच्या शेतात रविवारी (ता. २८) दुपारी ट्रॅक्टर चालविण्यात आला. त्यांनी १४ जूनला अडीच एकरात सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. लागवड केलेल्या बियाण्यांपैकी ४० टक्केच उगवण झाली. मध्यंतरी १० किलो बियाणे आणून त्यांनी टोकणही केले; परंतु पाऊसच नसल्याने हे बियाणेही आतच कुजले. त्यामुळे संपूर्ण शेत वखरण्याचा निर्णय घेत त्यांनी ट्रॅक्टर फिरवला. 

या पेरणीसाठी मशागतीपासून तर लागवडीपर्यंत २० हजार रुपये खर्च झाल्याचे ते म्हणाले. यंदा अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. खासगी व्यक्तीकडून व्याजाने पैसे आणून पेरणी केली होती. हा पहिला खर्च वाया गेला. आता दुसऱ्या पेरणीसाठी बियाण्याची कशी जुळवाजुळव करायची, पेरणी कशाने करायची हा पेच असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील येऊलखेड परिसरात पेरणी झाल्यानंतर जवळपास २० दिवस झाले पाऊस नाही.

यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. रविवारी या शिवारातही जवळपास १०० एकरातील पीक मोडण्यात आले. येऊलखेड परिसरात जूनच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसात २० दिवसांचा खंड पडला. जे पीक उगवले होते ते उष्णतेमुळे तग धरू शकले नाही.

त्यामुळे येऊलखेड येथील सदानंद पुंडकर यांनी २८ एकर, श्रीधर पुंडकर ३५ एकर, मोहन पाटील ८ एकर, अरुण मेटांगे, शिवशंकर पुंडकर, शशी पुंडकर व इतर शेतकऱ्यांनी मिळून १०० एकरांतील पिकावर नांगर फिरवला. आता कृषी खात्याचे पथक तेथे जाऊन पाहणी करणार आहे. 

पीक मोडण्याची कारणे 

  •  पीक अर्धवट उगवले
  •  बियाणे दर्जेदार नव्हते
  •  पावसाचा खंड वाढला
  •  टोकण केलेलेही उगवले नाही

इतर अॅग्रो विशेष
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...