agriculture news in Marathi farmer put plough on vegetable crop Maharashtra | Agrowon

भाजीपाला पिकावर फिरवला नांगर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 डिसेंबर 2020

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

नगरसूल, जि. नाशिक : आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही निघत नसल्याने येवला तालुक्यातील कुसमाडी येथील साठे बंधूंनी शेतातील मेथी व कोथिंबीर पिकावर नांगर फिरविला.

चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदा, मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी रोपे उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक पालेभाज्यांची लागवड केली. मात्र सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्च तर दूरच, केवळ वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्यामुळे प्रभाकर साठे व अशोक साठे या शेतकरी बंधूंनी पिकविलेल्या मेथी व कोथिंबिरीच्या जोमदार पिकांवर जड अंतःकरणाने नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला.

येथील प्रभाकर साठे यांनी १०० रुपये किलो दराने ७५ किलो मेथी बियाणे विकत आणून एक एकरात मेथीचे पीक घेतले. मशागत, खत, पाणी व मेहनतीने जोमदार पीक तयार केले. मात्र बाजारात सध्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने उभ्या मेथीच्या पिकावर नांगर फिरविला आहे. त्यांचे बंधू अशोक साठे यांनी कोथिंबीर लागवड केली. मात्र त्यांचीही तीच गत झाल्याने कोथिंबीर पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली. कोळगाव येथील शेतकरी विजय धनवटे यांनीही मेथी व कोथिंबीर पिकावर नाइलाजाने नांगर फिरविला आहे.

प्रतिक्रिया
अतिवृष्टीमुळे मका, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. मेथीच्या पिकाचा हातभार लागेल या आशेने पीक घेतले. पण उत्पादन खर्च दूरच वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.
- प्रभाकर साठे, शेतकरी, कुसमाडी, ता. येवला


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...