agriculture news in Marathi farmer put plough on vegetable crop Maharashtra | Page 3 ||| Agrowon

भाजीपाला पिकावर फिरवला नांगर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 डिसेंबर 2020

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

नगरसूल, जि. नाशिक : आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही निघत नसल्याने येवला तालुक्यातील कुसमाडी येथील साठे बंधूंनी शेतातील मेथी व कोथिंबीर पिकावर नांगर फिरविला.

चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदा, मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी रोपे उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक पालेभाज्यांची लागवड केली. मात्र सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्च तर दूरच, केवळ वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्यामुळे प्रभाकर साठे व अशोक साठे या शेतकरी बंधूंनी पिकविलेल्या मेथी व कोथिंबिरीच्या जोमदार पिकांवर जड अंतःकरणाने नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला.

येथील प्रभाकर साठे यांनी १०० रुपये किलो दराने ७५ किलो मेथी बियाणे विकत आणून एक एकरात मेथीचे पीक घेतले. मशागत, खत, पाणी व मेहनतीने जोमदार पीक तयार केले. मात्र बाजारात सध्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने उभ्या मेथीच्या पिकावर नांगर फिरविला आहे. त्यांचे बंधू अशोक साठे यांनी कोथिंबीर लागवड केली. मात्र त्यांचीही तीच गत झाल्याने कोथिंबीर पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली. कोळगाव येथील शेतकरी विजय धनवटे यांनीही मेथी व कोथिंबीर पिकावर नाइलाजाने नांगर फिरविला आहे.

प्रतिक्रिया
अतिवृष्टीमुळे मका, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. मेथीच्या पिकाचा हातभार लागेल या आशेने पीक घेतले. पण उत्पादन खर्च दूरच वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.
- प्रभाकर साठे, शेतकरी, कुसमाडी, ता. येवला


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...