agriculture news in marathi, Farmer Registration for 12 Farmers | Agrowon

शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता यावी यासाठी तासगाव, विटा आणि सांगली या ठिकाणी एकूण तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. सध्या सांगली येथील खरेदी केंद्रात आतापर्यंत केवळ १२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना हमीभावाने शेतीमाल विक्री करता यावी, यासाठी सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आवश्‍यक केली आहे. परंतु, शेतकऱ्यांना सध्या सातबारा उतारा मिळवणे कठीण बनले आहे.

सांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता यावी यासाठी तासगाव, विटा आणि सांगली या ठिकाणी एकूण तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. सध्या सांगली येथील खरेदी केंद्रात आतापर्यंत केवळ १२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना हमीभावाने शेतीमाल विक्री करता यावी, यासाठी सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आवश्‍यक केली आहे. परंतु, शेतकऱ्यांना सध्या सातबारा उतारा मिळवणे कठीण बनले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात उडिदाची १५ हजार १३३ हेक्‍टरवर पेरणी झाली. सोयाबीनची ३८ हजार ८७८ हेक्‍टरवर पेरणी झाली. सध्या जिल्ह्यात पेरणी केलेली सोयाबीनची काढणी सुरू आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. वास्तविक पाहता जत तालुक्‍यात प्रामुख्याने उडिदाचे मोठे क्षेत्र आहे. त्याठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, शासनाने त्याठिकाणी खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. त्यामुळे जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उडिदाची विक्री करायची कुठे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

चौकशीनंतर नोंदणीसाठी शेतकरी येईनात
विटा, तासगाव, आणि सांगली येथे हमीभाव खरेदी केंद्रात शेतकरी नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्‍यक आहेत. याची माहिती घेण्यासाठी शेतकरी येताहेत. नोंदणीसाठी शासनाने जाचक अटी घातल्याने चौकशी केल्यानंतर पुन्हा शेतकरी नोंदणीसाठी येत नसल्याचे चित्र आहे.

सातबारासाठी हेलपाटे
सांगली जिल्ह्यात सातबारा उताऱ्याचे शंभर टक्के संगणकीकरण झाले आहे. हमीभाव खरेदी केंद्रात शेतीमालाची विक्री करायची असल्यास सातबारा उतारा गरजेचा आहे, अशी अट शासनाने घातली आहे. त्यामुळे शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारू लागले. सातबारा मागणीसाठी गेल्यानंतर सातत्याने इंटरनेटरची कनेक्‍टीव्हिटी नाही, असे तलाठी सांगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळणे कठीण झाले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...