अकोला जिल्ह्यातील कापशी येथे‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा

अकोला जिल्ह्यातील कापशी येथे‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा
अकोला जिल्ह्यातील कापशी येथे‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा

अकोलाः जिल्ह्यात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा राबवला जात असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या सभा होत आहेत. तालुक्यातील मौजे कापशी (तलाव) येथे  कृषी उपसंचालक अशोक बाणखेले यांच्या उपस्थितीत सभा झाली. या वेळी मातीनमुना कसा काढावा, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, शेणखत, सेंद्रिय खताचा अभाव इत्यादी कारणांमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. शेती नियोजनामध्ये जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माती व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे मत या वेळी श्री. बाणखेले यांनी मांडले. नरेंद्र शास्त्री यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षणानुसार खताचा अवलंब करणे याविषयी माहिती दिली.  कार्यक्रमाला माजी सरपंच पुरुषोत्तम चतरकर, बाजार समिती संचालक विठ्ठल चतरकर, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, जी. एल. महल्ले, कृषी अधिकारी सरोदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अशोक बाणखेले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष माती नमुना कसा काढावा याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले. माती परीक्षण केल्यानंतर होणारे फायदे यांचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले. उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप बाणखेले यांच्याहस्ते करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com