agriculture news in Marathi farmer sudhakar kshirsagar got right of `sudhakar seedless` grapes variety Maharashtra | Agrowon

‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे क्षीरसागर ‘मालक’

माणिक देसाई
बुधवार, 22 जानेवारी 2020

नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर क्षीरसागर यांनी ‘सुधाकर सीडलेस’ नावाचा द्राक्ष वाण विकसित केला आहे. त्यांच्या या वाणाला केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.

नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर क्षीरसागर यांनी ‘सुधाकर सीडलेस’ नावाचा द्राक्ष वाण विकसित केला आहे. त्यांच्या या वाणाला केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.

सुधाकर क्षीरसागर हे अनेक वर्षांपासून द्राक्षाची पारंपरिक शेती करतात. त्यांच्याकडे पूर्वीपासून 'थॉमसन सिडलेस' या वाणाची लागवड होत होती. १९९४ मध्ये त्यांना स्वमुळ पद्धतीने (ओनरूट) लागवड केलेल्या थॉमसन जातीच्या द्राक्षबागेत एक वेगळ्या पद्धतीचे झाड आढळून आले. इतर झाडांच्या तुलनेत ही द्राक्षवेल‌ सशक्त दिसून आल्याची बाब क्षीरसागर यांनी हेरली. त्यानंतर ५ ते ६ वर्षे निरीक्षण करीत असताना पारंपरिक थॉमसन सिडलेसपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये त्यात आढळून आली.

फळांची गोडी, एकसारखेपणा, फळांची न होणारी कूज, द्राक्षमण्यांची तुलनेने कमी नैसर्गिक गळ, कमी संजीवकांच्या वापरात चांगली प्रतवारी, पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता आणि विशेष म्हणजे बुरशीनाशकाच्या कमी वापरामध्ये चांगले संरक्षण हे निर्यातीसाठी लागणारे सर्व गुण या जातीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. 

२००१ पूर्वी स्वमुळ पद्धतीने लागवड केली जात होती त्यानंतर वेगवेगळ्या द्राक्ष जातीचे कलम केले जाऊ लागले. त्या पद्धतीने ६० झाडांवर क्षीरसागर यांनी या वाणाचे कलम करून निरीक्षण केले. नंतर आलेले चांगले उत्पादन पाहून त्याच ६० झाडांच्या आधारे सुधाकर सिडलेसच्या लागवडीचे क्षेत्र वाढवले.

सन २०१२ मध्ये या सुधाकर सिडलेस वाणाच्या काड्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे प्रायोगिक लागवडीसाठी दिल्या. त्याचे चांगले परिणाम दिसल्याने पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. रोशनी समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे रोपाचे वाण आणि शेतकरी हक्काचे संरक्षण अधिनियम नियम २००१ नुसार ‘सुधाकर सिडलेस’च्या अधिकार हक्कासाठी अर्ज केला. 

गेल्या तीन वर्षांत दीपल रॉय चौधरी, डॉ .जयंत खिलारी, डॉ. विक्रम पांडे, डॉ. एस. बी. गुरव यांनी ‘सुधाकर सिडलेस’ वाणाच्या द्राक्षबागेला भेट देऊन निरीक्षणे नोंदवली. त्यानुसार अहवाल दिल्ली येथील कार्यालयात सादर केला. त्या अहवालानुसार ‘सुधाकर सिडलेस’ ही द्राक्षाची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण जात विकसित‌ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ‘सुधाकर सिडलेस’ या जातीच्या द्राक्षाचे अधिकृत अधिकार हक्क सुधाकर क्षीरसागर यांना देण्यात आले तसे प्रमाणपत्र नुकतेच त्यांना देण्यात
आले आहे.

सर्व हक्क क्षीरसागर यांना प्राप्त 
अधिकार हक्कानुसार श्री. क्षीरसागर यांच्या परवानगीशिवाय ‘सुधाकर सिडलेस’ या वाणाच्या रोपाची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण आयात, निर्यात कोणालाही परस्पर करता येणार नाही. कायद्याच्या आधारे दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे क्षीरसागर यांची परवानगी या वाणासाठी आवश्‍यक आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगतीपुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि...
एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रमगोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...