शेतकरी प्रशिक्षण ही काळाची गरज : डॉ. कांबळे

परभणी : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या शेतात उत्पादित शेतमालावर गावातच प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज आहे.’
Farmer training is the need of the hour: Dr. Kamble
Farmer training is the need of the hour: Dr. Kamble

परभणी : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या शेतात उत्पादित शेतमालावर गावातच प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. जे. कांबळे यांनी कले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन्स यांच्यातर्फे ‘हळद, सोयाबीन प्रकिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन’ यावर आयोजित प्रशिक्षणाचा समारोप झाला. यावेळी कांबळे बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. चव्हाण, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे, फार्म टु फोर्क सोल्युशन्सचे संचालक उमेश कांबळे, सदस्य शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे उपस्थित होत्या.

कांबळे म्हणाले, ‘‘ग्रामीण अर्थव्‍यवस्था सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी हळद तसेच सोयाबीनवर गावातच प्रक्रिया करावी. मुल्यवर्धनातून उत्पन्नात भर पडेल. उद्योगातून रोजगार निर्मिती होईल. गावे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील.’’ 

डॉ. खडसे म्‍हणाले, ‘‘ग्रामीण, शहरी भागातील जीवनशैली बदलली आहे. प्रक्रिया पदार्थांना मोठी मागणी आहे. शेतकरी, बचत गटाच्या महिला, बेरोजगार युवक, युवतींनी आपल्या भागातील कच्चामाल  लक्षात घेऊन छोटे मोठे प्रक्रिया उद्योग उभे करावे.’’ 

डॉ. खोडके म्‍हणाले, ‘‘सोयाबीनपासून ७० पेक्षाही अधिक उत्पादने तयार करता येतात. त्यात रोजच्या वापरातील सोयापनीर, सोयामिल्क, प्रोटिन पावडर, सोयाणे आदीचा समावेश आहे. सोयाबीन प्रक्रियेमुळे मुल्यवर्धन होते. त्यासाठी शेतेकरी, महिलांनी  तंत्रज्ञान आत्मसात करावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com