agriculture news in Marathi farmer under threat of rain Maharashtra | Agrowon

अवकाळीच्या दणक्याने वाढली चिंता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 जानेवारी 2021

 चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कोकणात आंबा, मध्य महाराष्ट्रात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

पुणे ः चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कोकणात आंबा, मध्य महाराष्ट्रात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. तर द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. अवकाळीच्या या दणक्यामुळे शेतकरी चिंतेत असून, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी पुढे येत आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई परिसरांत अवकाळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. काजू पिकालाही फटका बसला. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शनिवारीही सकाळपर्यंत काही भागांत रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती होती. 

मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी 
पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, खानदेशातील जळगाव भागात शुक्रवारी रात्री तुरळक सरी पडल्या. पुण्यामध्ये शनिवारी सकाळपर्यंत १९.३, पाषाण १९.२, तर लोहगाव येथे १९.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण निवळून ऊन पडल्याचे चित्र होते. झालेल्या पावसामुळे आंबेगाव, जुन्नर, खेड, नाशिक, नगर या भागांतील द्राक्ष पिकांचे चांगलेच नुकसान झाले. 

खानदेशात शुक्रवारी (ता.८) सायंकाळी धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. साक्री तालुक्यात २४ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला. नवापूर, तळोदा भागांत ३० मिलिमीटर पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात कुठेही जोरदार पाऊस झाला नाही, पण जळगाव, यावल, भुसावळ, चोपडा, धरणगाव, पारोळा, एरंडोल भागांत तुरळक पाऊस पडला. शनिवारी (ता.९) सकळीदेखील जळगाव, धुळे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे केळी काढणी, ऊसतोड, फवारणीची कामे ठप्प होती. 

मराठवाडा, विदर्भात कोरडे वातावरण 
मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यानंतर आता या भागात हवामान काहीसे कोरडे झाले आहे. अधूनमधून ढगाळ हवामान होत असले तरी पाऊस पडण्यासारखी स्थिती नसल्याने शेतकरी आपआपल्या कामात गुंतले आहेत. अनेक ठिकाणी तुरीच्या काढणीला व मळणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच अचानक होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना चांगलीच सतावत आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता 
गेल्या सात, आठ दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निवळू लागले आहे. मराठवाडा, विदर्भात काही अंशी ऊन पडत असले, तरी मध्य महाराष्ट्र व कोकणात अंशत ढगाळ व अधूनमधून ऊन पडत असल्याची स्थिती आहे. आज (रविवारी) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा भागांत काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. सोमवारपासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...