शेती जपणारे शेतकरी हेच शास्त्रज्ञ ः कुलगुरू डॉ. विश्‍वनाथ

शेती जपणारे शेतकरी हेच शास्त्रज्ञ ः कुलगुरू डॉ. विश्‍वनाथ
शेती जपणारे शेतकरी हेच शास्त्रज्ञ ः कुलगुरू डॉ. विश्‍वनाथ

सांगली ः ‘‘कृषी संशोधन केंद्र हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभलेले वरदान आहे. एकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा समूहाने एकत्र आल्याने क्षारपड जमीन मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. शेतीसारख्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवणारा शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे’’, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांनी व्यक्त केले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील आयोजित कृषी संशोधन केंद्रात राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षारपड जमीन सुधारणा तंत्रज्ञान, शेतकरी-शास्त्रज्ञ व शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संचालक डॉ. शरदराव गडाख, कोल्हापूर कृषी विद्यालयाचे डॉ. गजानन खोत, जिल्हा कृषी आत्मचे संचालक बसवराज मास्तोळी पाणी व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. सुनीला गोरंटीवार उपस्थित होते. 

डॉ. विश्‍वनाथ म्हणाले, ‘‘आज शेती मोठ्या प्रमाणात पिकत आहे. त्या तुलनेत शास्त्रज्ञ उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. येथील संशोधन केंद्रातील रिक्त आसलेल्या जागा लवकरच भरून शेतकऱ्याची गैरसोय दूर केली जाईल. येथील हळद व भुईमुगावर झालेले संशोधन कौतुकास्पद आहे.’’ 

श्री. गोरंटीवार म्हणाले, ‘‘मोकाट पाणी पद्धतीचा वापर करू नका. सिंचनाच्या गैरवापरामुळे क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांनी निचरा प्रणालीचा वापर करावा, त्याला आयुष्यमान भरपूर आहे.’’ कृषी केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कठमाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com