‘केंद्राची ६००० मदत : राज्य सुद्धा मागे राहणार नाही’

‘केंद्राची ६००० मदत : राज्य सुद्धा मागे राहणार नाही’
‘केंद्राची ६००० मदत : राज्य सुद्धा मागे राहणार नाही’

अकोला : राज्यच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आज (ता. ५) ते येथे आले होते. यावेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना मंत्री मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत या देशामध्ये सर्वात जास्त निधी उपलब्ध करणारे हे राज्य आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. हे रयतेचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन हे सरकार चालते आहे आणि म्हणून केंद्राने सहा हजार रुपयांची वार्षिक मदत घोषित केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही. जय किसान म्हणत शेतकऱ्यांचा सन्मान वाढवत या राज्यातील शेतकरी,अन्नदाता सुखीभव या भावनेने पुढच्या अर्थसंक्लपामध्ये शेतकरी हा केंद्र बिंदू राहिल हा विश्‍वास मी शेतकऱ्यांना देतो.’’ काय म्हणाले अर्थमंत्र पहा video...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com