agriculture news in Marathi farmer will get relief fund from Monday Maharashtra | Agrowon

अतिवृष्टिग्रस्तांना सोमवारपासून मदत : विजय वडेट्टीवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होती.

मुंबई : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होती. त्यानुसार सोमवारपासून (ता.९) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यात गेल्या महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऐन काढणीवर आलेली पिके भुईसपाट झाली होती. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल, असे ठाकरे यांनी घोषित केले होते.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्रही दिले आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...