agriculture news in marathi, The farmer will not be able to solve a loan | Agrowon

कर्जमाफीचे कोडे शेतकऱ्यास सुटेना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

परळी, जि. बीड : सहायक निबंधक कार्यालयाकडील कर्जमाफीच्या यादीत नाव दिसते. ते कार्यालय बॅंकेला कळविल्याचे सांगते. बॅंकेकडे गेले तर नाव आले नाही असे सांगितले जाते. त्यामुळे परळी तालुक्‍यातील नागापूरच्या धनंजय सोळंके यांच्या कर्जमाफीचे घोडे कोठे अडले हेच कळत नाही. आपल्यासारखीच स्थिती गावातील काही शेतकऱ्यांची असल्याची माहिती सोळंके यांनी दिली.

परळी, जि. बीड : सहायक निबंधक कार्यालयाकडील कर्जमाफीच्या यादीत नाव दिसते. ते कार्यालय बॅंकेला कळविल्याचे सांगते. बॅंकेकडे गेले तर नाव आले नाही असे सांगितले जाते. त्यामुळे परळी तालुक्‍यातील नागापूरच्या धनंजय सोळंके यांच्या कर्जमाफीचे घोडे कोठे अडले हेच कळत नाही. आपल्यासारखीच स्थिती गावातील काही शेतकऱ्यांची असल्याची माहिती सोळंके यांनी दिली.

परळी तालुक्‍यातील नागपूर येथील धनंजय सोळंके यांनी त्यांच्याकडील कर्जाची माफी मिळण्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात परळीचे सहायक निबंधकांना २९ जूनला निवेदन देऊन त्यांना पडलेले कर्जमाफीचे कोडे सोडविण्याची मागणी केली होती. त्यामध्ये मुळचे नागापूर (ता. परळी) येथील रहिवाशी धनंजय सोळंके हे एसबीआयच्या नागापूर शाखेचे ग्राहक आहेत. त्यांचा कर्ज खाते क्रमांक ६२१४३१५२६२०/ ६२१६७१८९९१५ आहे. त्यांच्या कुटुंबाकडे २०१३ पासून थकीत असलेल्या कर्जाची माफी मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एक वर्षापासून सर्व कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज केला. गरजेनुसार बॅंकेमध्येही कागदपत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला. परंतु कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. बॅंक शाखेमध्ये चौकशी केली तर तुमचे नाव यादीत आले नाही, असे सांगितले जाते.

आपल्या कार्यालयाकडे चौकशी केली तर यादी दाखवून पत्नी व माझ्या नावे दीड लाखाची कर्जमाफी तर १६ हजार ६४५ भरावे लागतील असे सांगून यादी बॅंकेला मेल केल्याचे सांगितले जाते. कर्जमाफीच्या गणिताचे कोडे कायम असल्याचे सोळंके यांनी म्हटले होते. परंतु याप्रकरणी आजतागायत काही उत्तर मिळाले नसल्याची माहिती श्री. सोळंके यांनी दिली. त्यामुळे आपल कर्जमाफीचे कोडे सुटले की नाही हा प्रश्न सोळंके यांना पडला आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे...चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल...
डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा...सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची...मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर...
नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे...नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित...
नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः...नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा...
शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठापरभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून...
बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८०...बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा...
मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी...सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर...
मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधीऔसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन...नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक...
गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय...आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील...
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
हवामान बदल रोखण्यासाठी पावले उचलण्याची...हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...