agriculture news in marathi farmer in worry regarding sale of thirty lakh rupees worth pomogranate | Agrowon

तीस लाखांची डाळिंबं झाडावरच सुकण्याची भिती; शेतकरी चिंतेत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

पुणे : कोरोना लॉकडाउन मुळे शेतमालाची मागणी थंडावल्याने अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी आता बाजार समित्या बंद झाल्यामुळे अधिक अडचणीत आला आहे. 

पुणे : कोरोना लॉकडाउन मुळे शेतमालाची मागणी थंडावल्याने अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी आता बाजार समित्या बंद झाल्यामुळे अधिक अडचणीत आला आहे. काढणीसाठी आलेली लाखो रुपयांची डाळिंब झाडावरच सुकण्याची भिती निर्माण झाली आहे. दर्जेदार डाळिंबे आता विक्री कशी करायची या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. 

धामणखेल (ता.जुन्नर) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी राजू कोंडे यांची यंदा ८ एकरवरील डाळिंब काढणीला आले आहेत. लॉकडाउन १४ एप्रिलला संपेल या आशेवर ते होते. मात्र लॉकडाउन वाढल्याने ते आणखी चिंताग्रस्त झाले आहेत. याबाबत कोंडे म्हणाले,‘‘यावर्षी डाळिंबाचे साधारण ३० टन उत्पादनातून सरासरी १०० रुपये किलोला दर मिळण्याची आशा होती. याद्वारे यावर्षी किमान ३० लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. गेल्या वर्षी ६० रुपये दराने जागेवरच डाळिंब विक्री केली होती. याद्वारे २२ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र कोरोना लॉकडाउनमध्ये शेतमाल वगळला असला तरी वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.’’  

‘‘अशातच बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. मी पुणे, नाशिक, नगर आणि मुंबई बाजार समित्यांमध्ये डाळिंब पाठवीत असतो. यावर्षी मात्र खरेदीदार बागांमध्ये येत नाहीत, मजूर मिळत नाही अशा परिस्थितीत काढणीला आलेले डाळिंब झाडावरच सुकण्याची भिती आहे. लॉकडाऊन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचा शेवटचा लिलाव १५० ते ३०० रुपये प्रति किलोने गेला आहे. त्यामुळे आमच्या डाळिंबाला किमान १०० रुपये दर मिळण्याची अपेक्षा होती.’’ 

‘‘डाळिंबाबरोबरच आमची काकडीचे उत्पादन अडीच एकरवर घेतले होते.काकडीचे हंगामात २० तोडे झाले असते. मात्र ८ तोड्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने काकडीचे पीक अर्धवट सोडले आहे. तशीच परिस्थिती झेंडूच्या फुलांची झाली. झेंडूचा प्लॉट काढून टाकण्याची वेळ आली,’’असेही कोंडे यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...