agriculture news in marathi A farmer from Yeola planted a JCB on a pomegranate orchard | Agrowon

येवल्यातील शेतकऱ्याने डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे डाळिंब बागेवर जेसीबी फिरवण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

नाशिक : गेल्या ६ वर्षांपूर्वी अडीच एकर क्षेत्रावर ८०० झाडांची लागवड होती. तेलकट डागाचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे फळगळ वाढली. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे डाळिंब बागेवर जेसीबी फिरवण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.  

येवला तालुक्यातील शेतकरी गजानन जिवाजीराव देशमुख यांची अडीच एकर डाळिंब बाग होती. मात्र, चालू वर्षी अतिवृष्टीसह तेलकट डागाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सततच्या पावसामुळे जे काही हाती आले, त्या फळांना गुणवत्ता नव्हती. तेलकट डाग अधिक असल्याने बाजार भाव मिळाला नाही.

काढणीस आलेल्या फळांची विक्री स्थानिक बाजारात कोपरगाव येथे केली. त्यास १० ते १२ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. या क्षेत्रात अवघे २०० क्रेट डाळिंब म्हणजे ४० क्विंटल माल निघाला. 

चालू वर्षीच्या हंगामात दीड लाखांवर खर्च या क्षेत्राला आला. मात्र अवघे ४० हजार उत्पन्न मिळाल्याने खर्चाचा ताळमेळ बसला नाही. त्यात उत्पादन निम्म्यावर घटल्याने खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी, या ३ वर्षांपासून सततच्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याने बागेवर जेसीबी फिरवला.

अगोदर निसर्ग चक्रीवादळात पोल्ट्रीचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. त्यातच आता डाळिंब बागेत खर्च करून काही हाती येत नसल्याने कठोर अंतःकरणाने बाग तोडण्याचा निर्णय घेतला.
- गजानन देशमुख, शेतकरी


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...