agriculture news in marathi, Farmers aggressive for sugarcane bills | Agrowon

ऊस बिलावरून शेतकरी आक्रमक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

नाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना संचालित धाराशीव कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना अध्यापही एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी वसाका कारखाना कार्यस्थळावर धडकले. मात्र येथील कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने ते तहसील कार्यालयात असल्याचे समजल्यानंतर थेट ते कार्यालय गाठले. या ठिकाणी ठिय्या मांडून कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाला तहसील कार्यालयात जाब विचारला. या वेळी संतप्त ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासनात बाचाबाची झाली.

नाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना संचालित धाराशीव कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना अध्यापही एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी वसाका कारखाना कार्यस्थळावर धडकले. मात्र येथील कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने ते तहसील कार्यालयात असल्याचे समजल्यानंतर थेट ते कार्यालय गाठले. या ठिकाणी ठिय्या मांडून कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाला तहसील कार्यालयात जाब विचारला. या वेळी संतप्त ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासनात बाचाबाची झाली.

ऊस उत्पादकांनी ऊस बिल व वजन पावत्या, एकूण पुरवठा केलेल्या उसाचा हिशेब मागितला. कारखान्याच्या प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तहसीलदारांसमोरच दोघांमध्ये बाचाबाची झाली. बिलमिळण्याबाबत घोषणाबाजी झाल्यामुळे तहसील कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला. तहसीलदार शेजूळ यांनी ठरलेल्या एफआरपीप्रमाणे पेंमेट अदा करणार असल्याचे सांगितले. 

ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील म्हणाले,  ‘‘कादवा कारखान्याने २६००, तर द्वारकादीश कारखान्याने २३७० रुपये प्रतिटन भाव दिला. मात्र या कारखान्याने १८८५ रुपयाने एफआरपीचे गाजर दाखवून ऊस उत्पादकांची फसवणूक केली. येत्या सात दिवसांत संपूर्ण ऊस बिलाचा हिशेब, वजन पावत्या व काटा पेंमेंटचा हिशेब न दिल्यास जिल्हा अधिकारी व साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.‘‘ या घोषणेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद आहेर आदींनी पाठिंबा दिला. 

समितीचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य कुबेर जाधव, देवळा शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पवार, कळवण तालुका स्वाभिमानी तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, वसंतराव पाटील, कैलास शिंदे, देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे, सुरेश पाटील, शशिकांत निकम, विलास पाटील सह निफाड, नवापूर, शिरपूर भागातील ऊस उत्पादक उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...