वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा सोयाबीनवरच भरवसा

सोयाबीन
सोयाबीन

अकोला  : गत हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा कापूस पिकाला बसलेला फटका पाहता या वेळी वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकालाच पसंती दिल्याचे समोर अाले अाहे. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत मिळून अातापर्यंत अाठ लाख ६७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला अाहे. सध्या हे पीक वाढीच्या स्थितीत असून, जूनमधील लागवड झालेल्या पिकाची फुलोरावस्था सुरू झाली अाहे.  

वऱ्हाड हा प्रदेश कापूस उत्पादनासाठी अग्रेसर समजला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत अाणि त्यातही सोयाबीनचे अागमन झाल्यानंतर पीक पद्धतीत बदल झाला. कमी खर्चात, मनुष्यबळात येणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती सातत्याने वाढत गेली. बाजारपेठेत भाव मिळाला किंवा नाही मिळाला तरीही शेतकरी सोयाबीनवरच अवलंबून राहू लागले.

या हंगामातसुद्धा सोयाबीन पिकानेच बाजी मारली. मागील वर्षात पुरेशा प्रमाणात सोयाबीनला दर मिळाला नव्हता. परिणामी शेतकरी पर्यायी पिकाचा विचार करतील असा अंदाज असताना पुन्हा एकदा सोयाबीनची लागवड झाली.

सोयाबीन लागवडीत बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी अाहे. या जिल्ह्यात तीन लाख ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. या पाठोपाठ वाशीम जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार अाणि अकोला जिल्ह्यात एक लाख ९५ हजार हेक्टरवर पेरणी झाली. सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा तसेच स्पोडोप्टेरा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत अाहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत अाहेत.  सोयाबीन पिकाला अावश्यक तेवढा पाऊस अाजवर झालेला असून, पिकाची वाढीची स्थिती जोमात अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com