agriculture news in marathi Farmers agitate for agri pump electricity continue supply | Agrowon

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

ॲग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 4 एप्रिल 2021

वीजपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी शनिवारी (ता. ३) जिल्ह्यातील रिठद उपकेंद्राच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले

वाशीम : वीजपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी शनिवारी (ता. ३) जिल्ह्यातील रिठद उपकेंद्राच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिली. 

वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विजेचा अर्धवट पुरवठा सुरू केला होता. कमी दाब, एकच फ्युज मिळत असल्याने सिंचनाचे काम होत नव्हते. पिके सुकली होती. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा उचलला.

जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, पंढरी मापारी, गणेश मापारी, सुनील मापारी, विशाल जाधव, वैभव जाधव, गजानन इंगोले यांच्यासह शिरसाळा, दापोरी, सोमठाणा या गावातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. वीज कार्यालयात आंदोलन सुरू झाल्याने वीज प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी खिचडी शिजवत जेवणही घेतले. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. त्यामुळे अखेरीस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती आंदोलकांनी दिली. 

प्रतिक्रिया...
वीजबिल भरूनही जर शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे सांगत वीज कंपनी सुरळीत पुरवठा ठेवत नसेल तर याला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.  
 - दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...