Agriculture news in Marathi Farmers agitate for new strategy | Page 3 ||| Agrowon

शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

तीन कृषी कायद्यांविरोधातील १० महिन्यांपासूनच्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागासह लगतच्या उपनगरांत राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणींच्या आनुषंगिक दाखल याचिकेवर येत्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १० महिन्यांपासूनच्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागासह लगतच्या उपनगरांत राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणींच्या आनुषंगिक दाखल याचिकेवर येत्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केले, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी सीमांवरील शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुन्हा ‘चलो दिल्ली’ची रणनीती आखली आहे.

न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यावर निकाल येणार आहे. मात्र न्यायालयाने यापूर्वी जी निरीक्षणे नोंदवली त्यामुळे प्रस्तावित निकालाबाबत मनात शंका उत्पन्न झाल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. 

सिंघू सीमेवर झालेल्या एका दलित तरुणाच्या हत्येमुळेही आंदोलनाला सेटबॅक बसल्याची भावना आंदोलकांत आहे. त्यामुळे निकालाच्या अगोदरच दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी व सुरवातीला जो उत्साह आंदोलनात होता तो परत निर्माण व्हावा यादृष्टीने शेतकरी नेत्यांनी रणनीती आखणे सुरू केले आहे. नजीकच्या काळात पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशाच्या विविध भागांत महापंचायती व मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पुन्हा ‘चलो दिल्ली’चे आवाहन करण्याचे शेतकरी नेत्यांनी ठरविले आहे. असे काही मेळावे पंजाब, हरियानात सुरूही झाल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान खोटे बोलत आहेत : टिकैत 
मोदी सरकार शेतकऱ्याला उद्योजकांच्या, कंपन्यांच्या हाती विकायला निघाले आहे व स्वतः पंतप्रधान कायद्यांबाबत खोटे बोलत आहे असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. शेतकरी सरकारबरोबर चर्चेसाठी कायम तयार आहेत. ११ फेऱ्यांच्या चर्चेनंतर सरकारच आम्हाला बोलावत नाही असे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना टिकैत म्हणाले की कॅप्टन अमरिंदरसिंग यापूर्वीही आम्हाला भेटले आहेत. त्यांच्या राजकारणाशी शेतकऱ्यांना देणे घेणे नाही. त्यांना व केंद्रीय मंत्र्यांनाही पुन्हा भेटण्यास शेतकऱ्यांना काहीही अडचण नाही. मात्र तीन कृषी कायदे रद्द करणे व हमीभावाचा (एमएसपी) कायदा करणे या मुख्य मागण्यांपासून चर्चेची सुरवात व्हावी या मागणीवर शेतकरी एकजूट व ठाम आहेत. शेतकऱ्याला आजही योग्य भाव मिळत नाही. त्याच्या अडचणी एखाददुसऱ्या पॅकेजने सुटणार नाहीत. तीन कृषी कायदे रद्द करणे हाच आंदोलनावर तोडगा काढण्याचा एकमेव उपाय आहे असेही टिकैत यांनी पुन्हा स्पष्ट केले.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...