agriculture news in marathi, UP farmers agitate over loan waiver, sugarcane dues | Agrowon

कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल, स्वामिनाथन आयोग शिफारसी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत शनिवारी (ता. २१) आंदोलन केले. किसान घाटाकडे मोर्चाने निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाझीपूर येथे अडविण्यात आले. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. 

नवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल, स्वामिनाथन आयोग शिफारसी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत शनिवारी (ता. २१) आंदोलन केले. किसान घाटाकडे मोर्चाने निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील गाझीपूर येथे अडविण्यात आले. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. 

भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेकडो शेतकऱ्यांच्या ११ सप्टेंबरपासून सरहनपूर ते दिल्लीतील किसान घाट अशा पायी मोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारी हा मोर्चा गाझीपूर येथे अडविण्यात आला. शेतकऱ्यांच्या ११ जणांचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे चर्चेसाठी गेले. सायंकाळी सहापर्यंत याबाबत निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांच्या मोर्चा आणि ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबा होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. 

शेतकऱ्यांच्या त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्ली येण्यापासून का रोखले जात आहे? भाजप सरकार निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयी सातत्याने बोलत होते. मात्र, जेव्हा शेतकरी थकीत ऊस बिल, कर्जमाफी, वीजबिलात कपात आदी मागण्या करीत आहेत, तर त्यांना बोलण्यापासून का रोखले जात आहे?
- प्रियांका गांधी, सचिव, काँग्रेस

देशातील शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. शेती उत्पन्न खूप कमी झाले आहे. गरिबी रेषेखाली शेतकरी जीवन जगत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करणे आवश्‍यक आहे. जर सरकार उद्योग शेत्राला अडचणीतून सावरण्यासाठी मदत करते, तर शेतकऱ्यांकरिता का नाही?
- सुधींद्र भदोरिया, नेते, बहुजन समाज पार्टी

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...