मराठवाड्यात पाणी नेण्यास विरोध

मराठवाड्यात पाणी नेण्यास विरोध
मराठवाड्यात पाणी नेण्यास विरोध

बुलडाणा : खडकपूर्णा संत चोखासागर प्रकल्पामधून जालना जिल्ह्यात जाणारी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकल्पग्रस्त व सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी (ता. ५) औरंगाबाद-अकोला महामार्गावर देऊळगावमही येथे चक्का जाम आंदोलन केले.  चक्का जाममुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या असताना, अजून त्यांनाच पाणी मिळालेले नाही. मग जालन्याला पाणी कसे देणार असा प्रश्न अांदोलकांनी उपस्थित केला. या वेळी बोलताना ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, ‘‘मंत्री बबनराव लोणीकरांना जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा स्रोत उपलब्ध असताना बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाण्याचा अट्टहास का करीत अाहेत.’’ लोणीकरांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पळवण्याचा प्रयत्न थांबवला नाही, तर रक्तरंजित क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल असा इशारा या वेळी तुपकरांनी दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ थुट्टे, संघर्ष समितीचे प्रकाश गिते, राष्ट्रवादी काँग्रेस नेते समाधान पाटील, गजेंद्र शिंगणे, काँगेसचे नेते अनिल शिंगणे, नाजीम खान, शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंगणे, मनसेचे नेते बालाजी देशमुख, भाजपचे नेते एकनाथ काकड, भारिपचे नेते धर्मराज खिल्लारे, एमआयएमचे नेते शेख जुनेद कुरेशी, ''स्वाभिमानी''चे बबनराव चेके, रणजित बागल, संतोष शिंगणे, गणेश शिंगणे, शेख जुल्फेगार, वसंतराव दहातोंडे, समाधान बुरकूल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com