agriculture news in Marathi farmers agitation for cotton procurement Maharashtra | Agrowon

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

महागाव तालुक्‍यातील गुंज येथील सीसीआयच्या केंद्रावर एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी अवघ्या १७५ शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्यात आली.

यवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील सीसीआयच्या केंद्रावर एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी अवघ्या १७५ शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापूर्वी घेणे शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या शेतकऱ्यांनी या विरोधात रास्तारोको करीत आपला रोष व्यक्‍त केला. तहसीलदार एस.एस. आदमुलवाड यांच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सीसीआयने गुंज येथे मंजित जिनींग या केंद्रावर कापसाची खरेदी चालविली आहे. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी १२७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लॉकडाऊन नंतर खरेदी सुरु करण्यात आल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १७५ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी करण्यात आला. २२० वाहने जिनींगच्या परिसरात खरेदीअभावी उभी आहेत.

त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी व्हावी आणि शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशाची उपलब्धता व्हावी, अशी मागणी शेतकरी नेते मनिष जाधव यांनी केली होती. २७ मे रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे याविषयावर निवेदनही देण्यात आले होते. परंतु त्या निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने मनिष जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.२) गुंज मार्गावर रास्तारोको करण्यात आला. 

सव्वा तास करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार एस.एस. आदमुलवाड, सहाय्यक निबंधक आर. टी. राठोड, सीसीआयचे ग्रेडर विधळे, मंजित जिनींगचे व्यवस्थाक सिंग यांनी रास्तारोकोच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रोज ४५ ऐवजी १०० गाड्यांमधील कापसाचे मोजमाप व्हावे अशी मागणी करण्यात आली. त्यावर रोज ८० गाड्यांचे मोजमाप करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...