Agriculture news in Marathi, Farmers agitation at the insurance company office | Page 2 ||| Agrowon

विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील ओरिएंटल पीकविमा कंपनीच्या कार्यालयात जोपर्यंत पैसे देणार नाहीत, तोवर हलायचे नाही, थेट मुक्काम ठोकण्याचा निर्णय मंगळवारी (ता. १७) घेतला आणि शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला. त्यामुळे धांदल उडालेल्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा आठवडाभरात पैसे देण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

सोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील ओरिएंटल पीकविमा कंपनीच्या कार्यालयात जोपर्यंत पैसे देणार नाहीत, तोवर हलायचे नाही, थेट मुक्काम ठोकण्याचा निर्णय मंगळवारी (ता. १७) घेतला आणि शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला. त्यामुळे धांदल उडालेल्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा आठवडाभरात पैसे देण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

गेल्या आठवड्यातही संघटनेने अशाच प्रकारचे आंदोलन केले. पण, पूर्ण प्रश्‍न निकाली काढला नाही. बार्शी तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांकडून गतवर्षीच्या खरीप हंगामात पीकविम्यापोटी प्रीमियम भरून घेतला. तसेच त्याच्या भरपाईची रक्कमही मंजूर झाली. पण, शेतकऱ्यांच्या खात्यावर काही ती पडेना, त्यामुळे शेतकरी संघटनेने आक्रमक होत, हा पवित्रा घेतला. 

मंगळवारी थेट पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील कंपनीचे कार्यालय गाठले आणि कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून न उठण्याचा निर्णय झाला. तत्पूर्वी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यानंतर शेतकरी विमा कंपनीत पोचले. पण रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. शेवटी आठवडाभरात पैसे देण्याचे आश्‍वासन कंपनीने दिल्यानंतर माघार घेण्यात आली. 

राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली औदुंबर झाडे, अक्षय उंबरे, पोपट गायकवाड, समाधान आगलावे, दगडू वाघ, अनुरथ आगलावे, विष्णू सुरवसे, उद्धव मुळे, कृष्णा घावटे, नागनाथ गायकवाड, दत्तात्रेय पाटील आंदोलनात सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...