‘माफसू’त विद्यार्थ्यांचे आंदोलन

आंदोलन
आंदोलन

नागपूर ः पशुधन पर्यवेक्षकांना पशुधन विकास अधिकारीपदावर देण्यात येणारी पदोन्नती अन्यायकारक असल्याचा आरोप करीत नागपूर पशुविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १२) आंदोलन केले. महाविद्यालयासमोरील रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याने वाहतूकदेखील प्रभावित झाली होती.  दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्‍तींना पशुधन पर्यवेक्षक पदावर नियुक्‍ती दिली जाते. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आणि तीन वर्षे सहायक पशुधन विकास अधिकारी असा एकत्रित वीस वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर पशुधन पर्यवेक्षकाला पशुधन विकास अधिकारीपदी पदोन्नती दिली जाते.   भरती नियमावलीमध्येदेखील तशा प्रकारची तरतूद आहे. याच तरतुदीचा आधार घेत सोमवारी (ता.११) राज्यातील १२५ पशुधन पर्यवेक्षकांना पशुधन विकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. मंगळवारी त्याचे पडसाद पशुविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उमटले. पशुविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी या पदोन्नतीचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर टायर पेटवून जाळपोळ केली. त्यानंतर घोषणाबाजीदेखील करण्यात आली. महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. अंबाडकर यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. सद्या आचारसंहिता असल्याने शासन पातळीवर आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली बाजू प्रशासकीयस्तरावर शांतपणे मांडावी, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. पशुधन विकास अधिकाऱ्याची साडेपाच वर्षे  पशुधन विकास अधिकारी नियुक्‍तीसाठी साडेपाच वर्षांचा बीव्हीएससी अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर निट ही प्रवेश परीक्षाही द्यावी लागते. याउलट पशुधन पर्यवेक्षक मात्र दहावी व नंतर दोन वर्षांचा डिप्लोमा करूनच पशुधन विकास अधिकारीपदासाठी पात्र ठरतो, याला विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com