agriculture news in Marathi, farmers agitation, Maharashtra | Agrowon

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन योजना जाहीर करा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची योजना जाहीर व्हावी, धरणगस्तांचे लाभ क्षेत्रात पुनर्वसन करावे, रोजगारासाठी जमीन मिळावी, धरणग्रस्तांसाठी तीन टीएमसी पाणी राखून ठेवावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेतर्फे सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सरचिटणीस लक्ष्मण पासलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची योजना जाहीर व्हावी, धरणगस्तांचे लाभ क्षेत्रात पुनर्वसन करावे, रोजगारासाठी जमीन मिळावी, धरणग्रस्तांसाठी तीन टीएमसी पाणी राखून ठेवावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेतर्फे सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सरचिटणीस लक्ष्मण पासलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

भामा-आसखेड प्रकल्पाचे काम राखीव पोलिस दलाच्या बंदोबस्तात युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना तिकडे फिरकूही दिले जात नाही. पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. जमावबंदी-संचारबंदीचे हुकूम जारी आहेत. प्रकल्पाच्या कामांत शासनाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कायदेशीर जबाबदारीचा विसर पडलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना बुडालेल्या जमिनीचा मोबदला वाढवून दिला की झाले, असा शासनाचा गैरसमज असावा. वास्तविक, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाची कायदेशीर जबाबदारी प्रकल्पाच्या योजनेतच समाविष्ट असताना ती शासनाने झटकून टाकली आहे. 

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रात वेळीच जमिनी संपादित न केल्याने आताचा प्रसंग ओढवला आहे, पुनर्वसन म्हणजे फक्त नुकसान भरपाईच नव्हे; तर कसायला लाभक्षेत्रात जमीन, गावठाणे, रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा इत्यादिंचा त्यात समावेश असते. पुनर्वसनाची योजना जाहीर करावी, पोलीस दडपशाही थांबवून जाहीर चर्चा करावी, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या परवडीची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी व्हावी, अशी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...