मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मंचर, जि. पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून शासनाचा निषेध नोंदविला. बसस्थानकासमोर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता थोरात यांच्या नेतृत्वाखाली रस्ता अडविण्यात आला होता. त्यामुळे नारायणगाव व राजगुरुनगरच्या दिशेने वाहनांच्या एक किलोमीटर अंतरात रांगा लागल्या होत्या. आंदोलनात बाबासाहेब खालकर, ठकसेन अरगडे, सुनील वाव्हळ, धनेश पोखरकर, नवनाथ पोखरकर, विकास एरंडे, सुभाष पोखरकर, हरिदास बांगर सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या आंदोलनात बांगर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "सरकारने दुधाचे बाजारभाव वाढून दिले जातील आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. पण शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. शेतकरी चिंतेत आहेत. शांतता मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यास त्याला शासनच जबाबदार राहील. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकरी आंदोलनावर केलेली टीका हास्यास्पद व दुर्दैवी आहे.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com