agriculture news in marathi, Farmers agitation in Manchar against government | Page 2 ||| Agrowon

मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

मंचर, जि. पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून शासनाचा निषेध नोंदविला.

मंचर, जि. पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून शासनाचा निषेध नोंदविला.

बसस्थानकासमोर शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता थोरात यांच्या नेतृत्वाखाली रस्ता अडविण्यात आला होता. त्यामुळे नारायणगाव व राजगुरुनगरच्या दिशेने वाहनांच्या एक किलोमीटर अंतरात रांगा लागल्या होत्या. आंदोलनात बाबासाहेब खालकर, ठकसेन अरगडे, सुनील वाव्हळ, धनेश पोखरकर, नवनाथ पोखरकर, विकास एरंडे, सुभाष पोखरकर, हरिदास बांगर सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या आंदोलनात बांगर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.

ते म्हणाले, "सरकारने दुधाचे बाजारभाव वाढून दिले जातील आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. पण शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. शेतकरी चिंतेत आहेत. शांतता मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यास त्याला शासनच जबाबदार राहील. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकरी आंदोलनावर केलेली टीका हास्यास्पद व दुर्दैवी आहे.''

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...