साकळाई योजनेसाठी दुष्काळी ३५ गावांतील शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

नगर : साकळाई उपसासिंचन योजनेस तांत्रिक मंजुरी व सर्वेक्षण करण्याच्या मागणीसाठी नगर व श्रीगोंदे तालुक्‍यांतील ३५ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (ता. १) मोर्चा काढला.  कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मागणीची तड लवकरात-लवकर सरकारने लावावी, अन्यथा ३५ गावांतील शेतकरी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा साकळाई उपसा सिंचन योजनेच्या कृती समितीतर्फे देण्यात आला.  गेल्या वीस वर्षांपासून साकळाई योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे योजना रखडली आहे. परिसरात १२० पाझर तलाव व ११० बंधारे भरण्यासाठी दोन हजार १५० दशलक्ष घनफूट इतके पाणी आवश्‍यक आहे. हे पाणी कुकडी प्रकल्पातून उपलब्ध होऊ शकते. कुकडी कालव्याद्वारे विसापूर धरणात पाणी उपलब्ध करून दिले, तर १८ हजार ५०१ हेक्‍टर क्षेत्र हंगामी सिंचनाखाली येईल, परिसरातील जमिनी बागायती होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजना मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.  ‘या' गावांना ‘साकळाई'ची प्रतीक्षा  नगर - हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा, खडकी, वाळकी, दहीगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीसी, गुणवडी, राळेगण, गुंडेगाव, वडगाव तांदळी, बाबुर्डी बेंद, देऊळगाव व अंबिलवाडी. श्रीगोंदे- मांडवगण, महांडूळवाडी, वडगुल, कामठी, खांडगाव, बनपिंपरी, बांगर्डे, पिसोरेखांड, रुईखेल, भानगाव, कोळगाव, चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, सुरेगाव, कोतुळ, ढोजे व उख्खलगाव.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com